Breaking News

नामांतराच्या लढ्याहून अधिक तीव्र संविधान बचाव अभियान राबवणार - यशवंत वाघमारे

नामांतर लढ्यातील शाहिदांच्या कुटुंबीयांचा सन्मान सोहळा संपन्न 

परळी  : नामांतराच्या लढ्याहून अधिक तीव्र संविधान बचाव अभियान राबवणार असल्याचे प्रतिपादन यशवंत वाघमारे यांनी केले. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सभागृह, साठे नगर परळी वै. येथे दि.२० जानेवारी रोजी नामांतर लढ्यातील शाहिद पोचीराम कांबळे व गौतम वाघमारे यांच्या कुटुंबीयांचा सत्कार समारंभ कार्यक्रम संपन्न झाला यावेळी ते बोलत होते. तसेच परळी शहर हे चळवळीचे केंद्रबिंदू असल्याने पँथर चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्त्यांचाही सन्मान यावेळी करण्यात आला.

 

सविस्तर माहिती अशी की, डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे मराठवाडा मराठवाडा विद्यापीठाला नाव देण्यात यावे यासाठी पुकारलेल्या लढ्यात शाहिद झालेले पोचीराम कांबळे, गौतम वाघमारे यांच्या कुटुंबीयांचा धोंडूबाई पोचीराम कांबळे, सुरेखा चंदर कांबळे, मरिबा कांबळे, बाबुराव पोचीराम कांबळे, जयश्री कांबळे, रोहित कांबळे, मीनाताई चंदर कांबळे, शशिकांत वाघमारे, यशवंत वाघमारे, गौतम वाघमारे यांचा सन्मान परळी वै. येथील मातंग समाजबांधवांच्या वतीने नेते जितेंद्र मस्के, रमेश मस्के यांच्या वतीने शहरातील साठेनगर, भागातील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सभागृहात झाला. 

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लसाकमचे के. डी.उपाडे तर प्रमुख पाहुणे म्हणून मनरेगा चे विजयकुमार गंडले, काँग्रेसचे विश्वनाथ गायकवाड, वंचितचे मिलिंद घाडगे, नगरसेवक केशव गायकवाड, न.प.चे माजी सभापती पंडित झिंजुर्डे, रिपाइं चे सुरेश रोडे, ज्येष्ठ नेते दत्ता सावंत, संगमचे सरपंच रामेश्वर कोकाटे महाराज, फुले आंबेडकरी अभ्यासक भगवान साकसमुद्रे, लक्ष्मण वैराळ, पत्रकार दत्तात्रय काळे, जगदीश शिंदे, प्रा.विनोद जगतकर, अंबाजोगाई चे अशोक पालखे, दत्ता कांबळे, युवा नेते विजय हजारे, नितीन बनसोडे, मिलिंद क्षीरसागर, आदींची उपस्थिती होती. यावेळी यशवंत वाघमारे म्हणाले की, डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे नाव मराठवाडा विद्यापीठाला देण्यासाठी आमच्या कुटुंबीयांनी जीवाची पर्वा न करता जो संघर्ष केला त्या संघर्षाचा वारसा आम्हाला लाभला आहे. भारतीय संविधानाने आम्हाला हक्क अधिकार दिले तेच संविधान आज घडीला धोक्यात आहे. यामुळे नामांतराच्या लढ्याहून अधिक तीव्र संविधान बचाव अभियान राबवणार असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन जितेंद्र मस्के यांनी केले तर उपस्थितांचे आभार रमेश मस्के यांनी मानले.






No comments