Breaking News

आजच्या मातांनी माँ जिजाऊ चा आदर्श घ्यावा - अर्चना दायमा


माजलगाव :
समाजकारण , राजकारण , आदर ,  जिव्हाळा ,त्याग , निष्ठा या नैतिक मुल्यांचे भांडार माँ.जिजाऊ यांच्या चरित्रात आहे. आजच्या परिस्थीतीत याची नितांत गरज आहे. वर्तमानात मातांनी माँ.जिजाउचा आदर्श घेवुन नितीवान पिढी घडवावी. असे विचार शिक्षीका अर्चना दायमा यांनी म.ज्यो.फुले विद्यालयात माँ.जिजाउ आणि युगपुरूष स्वामी विवेकानंद यांच्या जयंती सोहळ्यात व्यक्त केले. प्रमुख वक्त्या म्हणुन त्या बोलत होत्या.

कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी म.फुले माध्यमिक विद्यालयाचे मु.अ. कवी प्रभाकर साळेगावकर हे होते. सत्कार मुर्ती जेष्ठ पत्रकार संतोष मुळी , प्राथमिक विद्यालयाचे मु.अ. श्री प्रदीप भिलेगावकर , विजयकुमार कुलकर्णी ,संतोष जोशी ,सुमंत गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती. 

प्रारंभी प्रतिमापूजन झाले. उर्मिला झांबरे यांनी जिजाऊ वंदना सादर केली. ओघवते प्रास्ताविक सुमंत गायकवाड यांनी केले. पत्रकार संघाचा दर्पण पुरस्कार मिळालेले ,विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक श्री संतोष मुळी यांचा ह्मद्य सत्कार संपन्न झाला. सत्काराला उत्तर देताना मुळी म्हणाले. आपलेपणाची ही शाल व तिची उब सदैव उर्जा दायी असेल. यावेळी त्यांनी स्वामी विवेकानंद व माँ.जिजाउ यांच्या प्रेरक कार्यावरही प्रकाश टाकला.

यावेळी प्रदीप भिलेगावकर यांचेही समयोचित मनोगत झाले. अध्यक्षीय समारोप करताना कवी प्रभाकर साळेगावकर यांनी कविता सादर केली , समारंभातील उच्चतम विचार अधोरेखित केले. श्री ओ.एम.दायमा , प्रविण काळे , राजाभाउ शिवणकर , सुमेध घाडगे यांनी संयोजन सहाय्य करुन समारंभ नेटका केला. श्री अरुण सोळंके यांनी बहारदार सुत्रसंचलन केले तर संतोष जोशी यांनी आभार व्यक्त केले.





No comments