Breaking News

अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या टिप्परने शेतकऱ्याचा घेतला जीव : संतप्त ग्रामस्थांनी घटनास्थळी मांडला ठिय्या


गेवराई : शेतात जात असलेल्या एका शेतकऱ्याला अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या टिप्परने धडक देऊन झालेल्या अपघातात शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना गेवराई तालुक्यातील गंगावाडी लगतच्या पुलावर सोमवारी सकाळी ६. ३०  वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेने संतप्त झालेल्या गावकऱ्यांनी घटनास्थळी ठिय्या मांडला असून मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला आहे. 

तालुक्यातील गंगावाडी येथील शेतकरी रुस्तम मते (वय६०) हे सोमवारी सकाळी ६.३० सुमारास आपल्या शेतात चक्कर मारण्यासाठी जात असताना राक्षस भुवन येथून वाळू घेवून भरधाव वेगानं जाणाऱ्या अज्ञात टिप्परने चिरडले. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातस्थळी शेतकरी रुस्तम यांच्या शरीराचे दोन तुकडे झाले होते. या घटनेने गावकरी संतप्त झाले असून अवैधरित्या चालणारी वाळू - उपसा बंद करा व दोषींवर कारवाई करण्यात यावी, यासाठी गावकऱ्यांनी घटनास्थळी ठिय्या आंदोलन सुरू केले असून जोपर्यंत कारवाई होत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेण्यास गावकऱ्यांनी नकार दिला असून या घटनेने खळबळ उडाली आहे.  





No comments