Breaking News

दोन दिवसात इमापूर रस्ता दुरुस्तीच्या कामाचे आमदारांनी दिलेल्या आश्वासनाचं झालं काय? - आम आदमी पार्टीचा सवाल


बीड :  इमामपूर रस्त्याचे काम रखडल्याने या भागात राहत असलेल्या हजारो लोकांना घाणीचा, अस्वच्छतेचा सामना करावा लागत आहे, या भागातील वाहतूक खोळंबली असून सर्व जनता प्रचंड त्रस्त झालेली आहे.

     3 दिवसांपूर्वी स्थानिक आमदार संदीप क्षीरसागरांनी 2 दिवसांत या रस्त्याचे काम सुरू करायला भाग पाडतो असे आश्वासन दिले होते मात्र या आश्वासनाचा काहीही परिणाम झालेला नाही. आज आश्वासन देऊन 3 दिवस झाल्याचे आपचे जिल्हाध्यक्ष अशोक येडे म्हणाले. या आंदोलनात महिला, तरुण, जेष्ठ मोठ्या संख्येने सहभागी झालेले असून जोपर्यंत रस्ताकाम सुरु होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याची भूमिका आपने घेतली आहे.No comments