Breaking News

टेक्निकल फिर्यादीतून लोकपत्रकार वगळा : भागवत तावरेंच्या पाठीशी जनमानस उभा


बीड : दैनिक लोकाशाचे वृत्त संपादक भागवत तावरे यांच्यावर दाखल झालेला गुन्हा नाहक असून दोन राजकीय पक्षाच्या भांडणात पत्रकारिते वरचा सूड असल्याचे सामान्य लोकांतून चर्चिले जात आहे . या संदर्भाने पोलीस अधीक्षक राजा रामास्वामी यांना निवेदन देऊन पटेल फाउंडेशन व नाळवंडी ग्रामस्थ यांनी लेखी निवेदन देऊन भागवत तावरे यांच्या संदर्भात न्याय करण्याची मागणी केली.

   नाळवंडी पंचायत समिती सदस्य उत्तरेश्वर सोनवणे यांना 9 जानेवारी रोजी रात्री मारहाण झाल्या नंतर त्याची प्रतिक्रिया घेण्यासाठी पत्रकार म्हणून भागवत तावरे यांनी भेट दिली ज्याचा आकस धरून ज्यांनी मारहाण केली त्यांनी एका फिर्यादिस समोर करून पत्रकार भागवत तावरे यांच्या वर गंभीर आरोप करत तक्रार दिली ज्यामुळे समाजात  नाराजी व्यक्त होत आहे , सामान्य पातळीवर अनेक संघटना भागवत तावरे यांच्यावरील आरोप खोडसाळ असल्याचे म्हणत लेखी निवेदन घेऊन पोलीस अधीक्षक यांच्या दालनात पोहचली . आपल्यावरील आरोप खोडून काढण्यासाठी खोटी क्रॉस तक्रार देऊन तांत्रिक गुन्हा दाखल केल्याची चर्चा जिल्हा भरातून समोर येत आहे पोलीस  प्रशासन कडून या संदर्भात तपास करून सत्य जनते समोर आणावे अशी मागणी पटेल फाउंडेशन व नाळवंडी ग्रामस्थ कडून करण्यात आलेली आहे.  पटेल फाउंडेशन चे तालुका अध्यक्ष बिबिशन कदम व नाळवंडी सरपंच राधाकृष्ण म्हेत्रे यांच्या नेतृत्वात दोन शिष्टमंडळ पोलीस अधीक्षक व जिल्हाधिकारी कार्यलयात भेटली. निवेदन देताना पटेल फाउंडेशन चे जिल्हा अध्यक्ष तौफिक पटेल, शहर अध्यक्ष सय्यद तौफिक, शेख मोहसीन, डॉ राजीव काळे, कैलास गायकवाड,  पत्रकार गणेश काळे, श्रीहरी राऊत, उपसरपंच नाळवंडी अरुण तम्बरे, नारायण राऊत , योगेश जोशी, शेख आदिल,  शहबाज पटेल जिशान शेख आदींनी यावेळी भेट घेतली.


आमचा कायद्यावर विश्वास 

भागवत तावरे व त्यांचे लिखाण बीड महाराष्ट्राला माहीत आहे त्यांचा विविध सामाजिक व मदत मोहिमेतील सहभाग लक्षवेधी राहिलेला आहे , दैनिक लोकाशाने नेहमीच परखड लिखाण व सामाजिक मोहिमांचे नेतृत्व केले आहे . पोलीस प्रशासन सोबत केरळ मदत मोहीम , सांगली कोल्हापूर मोहीम व कोरोना काळातील जिओ जिंदगी मोहीम राबवून सामाजिक सलोखा जपला आहे , खोट्या केसेस मुळे चांगल्या व्यक्ती व वृत्तीच्या विरोधात दाखल झालेले गुन्हे कायद्याला व पोलीस प्रशासनाच्या प्रतिमेला धक्का पोहचतात , लोकांचा विश्वास आणि प्रतिमा जपली गेली पाहिजे या साठी तांत्रिक गुन्हे दाखल होऊ नयेत आणि चांगल्या लोकांची कौटुंबिक आणि मानसिक खच्चीकरण होऊ नये अशी अपेक्षा शिष्टमंडळाने बोलून दाखवली . यावेळी गणेश राऊत दादासाहेब खिंडकर गणेश तांबे धनंजय गुंदेकर शेख सलीम जालिंदर काकडे योगेश शेळके  संग्राम धनंवे चंद्रसेन राऊत यांनी प्रतिक्रिया दिल्या.

No comments