Breaking News

दिलीपराव काळे यांची एकसष्टी मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न


सत्यपाल महाराजांच्या सत्यवाणीचा कार्यक्रम ठरला उत्कृष्ठ

आष्टी : कडा कारखान्याचे माजी कार्यकारी संचालक दिलीपराव काळे यांच्या ६१ व्या वाढदिवसानिमित्त १४ जानेवारी रोजी फत्तेवडगाव ग्रामस्थांनी अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त राष्ट्रीय समाज प्रबोधनकार सप्तखंजेरी वादक सत्यपाल महाराज यांच्या सत्यवाणीचा कार्यक्रम आयोजित केला होता यावेळी राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.

           यावेळी माजी आमदार भीमराव धोंडे यांनी उपस्थित राहून जुन्या आठवणींना उजाळा देत सांगितले की, दिलीपराव काळे हे अहमदनगर येथे गजराज ड्रायक्लिनिंग येथे नोकरीला होते. तेथून त्यांना आष्टीला बोलावून घेतले आणि माझे स्वीय सहायक म्हणून नियुक्त केले. काही दिवसांनंतर कडा कारखान्याची जबाबदारी दिली आणि त्यांच्या प्रामाणिकपणामुळे त्यांचा मुलगा तुषार काळे यांनाही माझ्या संस्थेत शिक्षक म्हणून नियुक्त केले आहे. आज तो ही माझा पी.ए.म्हणून काम पाहत आहे तसेच फत्तेवडगाव या गावातील रस्ते, सिमेंट बंधारे, पाझर तलाव असे अनेक कामे मार्गी लावल्याचे सांगितले.

 दिलीपराव काळे यांना पुढील निरोगी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी दिलीपराव काळे यांनी सत्काराला उत्तर देताना सांगितले की, आजपर्यंतच्या आयुष्यातील बहुतेक वेळ हा सामाजिक कार्य करण्यासाठीच खर्च केला आहे तसेच यापुढेही गावातील गरजू लोकांसाठी कायम उपलब्ध असणार असून आजपर्यंत जीवनात कधी कोणाचे वाईट चिंतीले नसून अनावधानाने कोणाचे मन दुखावले असेल तर मनापासून माफी मागतो आणि यापुढे असेच प्रेम असुद्या मी कायम लोकांसाठी काम करत राहील असे भावनिक उदगार केले.

           सामाजिक चळवळीचा भाग म्हणून राष्ट्रीय समाज प्रबोधनकार, सप्तखंजेरी वादक सत्यपाल महाराज यांच्या सत्यवाणीचा कार्यक्रम संपन्न झाला.


सत्यपाल महाराजांनी आधुनिक काळातील चुकीच्या विचारांवर प्रकाश टाकत नागरिकांना साधं सोपं जीवन जगण्याचे आवाहन करून गरिबांसाठी वेळ देण्याचे सांगितले. यावेळी माजी आमदार भीमराव धोंडे, जि.प.सदस्य सतीश शिंदे, उद्धव दरेकर, महेश मल्टीस्टेट चे जेष्ठ संचालक विठ्ठलराव बनसोडे, युवा नेते अभयराजे धोंडे, भाजपा तालुकाध्यक्ष ॲड.हनुमंत थोरवे, मैनुद्दीन शेख, प्राचार्य.डॉ.हरिदास विधाते, डॉ.सोपान निंबोरे, पत्रकार उत्तम बोडखे, शरद रेडेकर, शरद तळेकर, प्रा.विनोद ढोबळे, गंगाधर आजबे, दादासाहेब हजारे, ॲड.भाऊसाहेब सायंबर, प्रा. शिवदास विधाते, सुभाष वाघ, माऊली बोडखे, इंजि.पांडुरंग बोडखे, माजी पं.स.सदस्य डॉ.सुनील गाडे, शिवसंग्राम तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर चौधरी, उद्योजक अशोक चौधरी, सभापती बद्रीनाथ जगताप, उपसभापती रमेश तांदळे, सरपंच राम धुमाळ, संजय नालकोल, नागेश आवारे, गौतम ससाणे, बाबा ससाणे, गोरक्ष तावरे, भाऊसाहेब देसाई, वाय.आर.गर्जे, गटशिक्षणाधिकारी यादव, प्रगतीशील शेतकरी बबनराव औटे, विठ्ठल आजबे, भागीरथ धारक, रघुनाथ शिंदे, अमृत वांढरे यांच्या सह ग्रामस्थ व प्रतिष्ठित, जेष्ठ नागरिक व महिलांसह नातेवाईक तसेच इतर अनेक मान्यवर उपस्थित होते. 
No comments