Breaking News

भाजपला सोडचिठी देत शिवाजीराव शिंदे यांनी बांधले शिवबंधन


शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, कॅबिनेट मंत्री संदीपान भुमरे, जिल्हाप्रमुख सचिन मुळूक यांच्या उपस्थितीत झाला जाहीर प्रवेश

परळी :  तालुक्यात गेल्या तीस वर्षांपासून सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे, लोकप्रतिनिधी व राजकीय अनेक पदे भूषवून सर्व सामान्यांना न्याय मिळवून देणारे भाजपचे जेष्ठ नेते शिवाजीराव शिंदे यांनी आज भाजपच्या उदासीन कार्याला कंटाळून भाजपला सोडचिठी देत केज येथे झालेल्या शिवसेनेच्या बैठकीत शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, कॅबिनेट मंत्री संदीपान भुमरे, जिल्हाप्रमुख सचिन मुळूक, तालुका प्रमुख व्यंकटेश शिंदे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून भगवा ध्वज हाती घेऊन शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.

यावेळी शिवसेनेच्या जेष्ठ कनिष्ठ सर्व पदाधिकाऱ्यांनी त्यांचे शिवसेनेत मनःपूर्वक स्वागत केले. प्रवेशावेळी विधानसभा संघटक राजभैया पांडे, शहर प्रमुख राजेश विभूते, जिल्हा सह संघटक रमेश चौंडे, युवासेना तालुका समन्वयक संतोष चौधरी, रोहयो समिती सदस्य संजय फड, पंडित गुट्टे, शहर अधिकारी कृष्णा सुरवसे, शहर समन्वयक सुदर्शन यादव, तुकाराम अप्पा नरवाडे, अजय आवाड आदी शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते, यावेळी शिवाजीराव शिंदे यांनी मरेपर्यंत शिवसेनेत काम करणार व व्यंकटेश शिंदे यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहून शिवसेना वाढीसाठी यथाशक्ती पणाला लावणार असल्याचे मत व्यक्त केले.

No comments