Breaking News

लोकनेते गोपीनाथ मुंडे अखंड पाणपोईच्या दिनदर्शिकेचे आ.गोपीचंद पडळकर यांच्या हस्ते प्रकाशन

माजलगाव :  लोकनेते गोपीनाथ मुंडे आखंड पाणपोई माजलगावच्या काढण्यात आलेल्या दिनदर्शिकेचे दि ०३ जाने रविवार रोजी परळी वैजनाथ येथे बहुजन नेते तथा विधान परिषदेचे सदस्य आमदार गोपीचंद पडळकर यांच्या हास्ते थाटात प्रकाशन करण्यात आले.

आ.गोपिचंद पडळकर हे दि ०३ जाने रविवार रोजी पांगरी येथील गोपीनाथ गड येथे लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या दर्शनासाठी आले आसता त्यांच्या हस्ते गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठान आयोजित लोकनेते गोपीनाथ मुंडे अखंड पाणपोईच्या दिनदर्शिकेचे थाटात प्रकाशन करण्यात आले या कार्यक्रमाला भारतीय जनता पार्टीचे माजलगाव तालुका उपाध्यक्ष तथा सरपंच ज्ञानेश्वर सरवदे,अविनाश कांडुरे, भगीरथ शेजुळ, सरपंच कल्याण कसपटे बाबा हांडे,गजानन देवकते या कार्यक्रमाचे आयोजक लोकनेते गोपीनाथ मुंडे अखंड पाणपोईचे अध्यक्ष तात्या पांचाळ यांनी केले होते.


No comments