Breaking News

.....अन्यथा संभाजी ब्रिगेड स्टाईलने आंदोलन करणार

परळी : सिरसाळा शहरासह परिसरात अवैध धंद्यांचा  सुळसुळाट चालू असून, याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. या परिसरात बिंगो, मटका, गुटखा, दारु, यासह अनेक अवैद्य धंदे सर्रास चालू असून, यावर कोणाचाही अंकुश राहिला नाही. उलटपक्षी प्रशासन आणि सरकारचा या धंद्यांना पोसत आहे का  काय ? असा प्रश्न सर्वसामान्याच्या मनाला भेडसावत आहे. 

     आज सिरसाळा पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक पुरी साहेब यांना संभाजी ब्रिगेडच्या वतीने निवेदन देण्यात आले असून या निवेदनाची दखल घेऊन हे धंदे तात्काळ थांबविण्यात यावेत. गेल्या अनेक दिवसापासून सिरसाळा व परिसरात अवैध धंदा करणाऱ्या लोकांनी उद्रेक केला असून, यावर प्रशासन व सरकारचा अंकुश राहिलेला नाही असे निदर्शनात आले आहे. हे धंदे तात्काळ थांबवा अन्यथा संभाजी ब्रिगेड स्टाईल उग्र स्वरुपाचे आंदोलन करण्यात येईल. असा इशारा संभाजी ब्रिगेडचे तालुका अध्यक्ष शिवश्री देवराव लुगडे महाराज, संभाजी ब्रिगेड परळी शहराध्यक्ष सेवकराम जाधव, सामाजिक कार्यकर्ते शिवश्री अरुण दादा सपाटे, शिवश्री सलीम शेख, शिवश्री पवन माने यांनी दिला आहे.
No comments