Breaking News

शिवसेना नेते शिवाजीराव शिंदे यांचा पायगुण सेनेसाठी ठरला लाभदायक : एकच नगरसेवक असलेल्या सेनेला मिळाले महिला व बालकल्याण सभापती पद

परळी वैजनाथ :  २२ जानेवारी रोजी झालेल्या नगर परिषद सभापती निवडीत एक उल्लेखनीय बाब समोर आली आहे. शिवसेनेच्या एकमात्र नगरसेवीका श्रीमती गंगासागर बाबुराव शिंदे यांना महिला व बालकल्याण सभापती पद मिळाले आहे. नुकताच शिवाजीराव शिंदे यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे त्यांचा पायगुण सेनेसाठी लाभदायक ठरला अशी चर्चा आज दिवसभर राजकीय वर्तुळात रंगली.

परळी नगर परिषदेच्या विषय समित्यांची आज फेरनिवड संपन्न झाली. आज झालेल्या फेरनिवडीमध्ये धनंजय मुंडे यांनी सर्व जाती-धर्मांवर न्याय करतच महाविकास आघाडीच्या धर्माचेही पालन केल्याचे दिसून आले आहे. परळी नगर परिषदेत एकूण ३२ निवडून आलेले व ३ स्वीकृत असे एकूण ३५ नगरसेवक आहेत. यांपैकी जवळपास ३० नगरसेवक एकट्या राष्ट्रवादी काँग्रेसचे तर श्रीमती गंगासागर शिंदे या एकमेव शिवसेनेच्या नगरसेविका आहेत. 

गेल्या वर्षीही सेना महाविकास आघाडीत होती पण त्यांना कोणतेही सभापती पद मिळाले नाही. यंदा मात्र त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यातील नगर पालिकेत विषय समितीत स्थान मिळाले आहे. त्यामुळे त्यामुळे शिवाजीराव शिंदेंचा पायगुण लाभी ठरला अशी चर्चा यानिमित्ताने सर्वत्र झडत आहे.No comments