Breaking News

केज तालुक्यातील ग्रामपंचायतच्या निवडणुकीत महाविकास आघाडी व भाजपा फिप्टी-फिफ्टी


महाविकास आघाडी आणि भाजपा दोघांचेही आमचीच सरशी झाल्याचे दावे- प्रतिदावे

पैठण सावळेश्वर येथील निवडून आलेल्या सदस्यांनी गावात येताच हातात खराटा घेऊन केली ग्रामस्वच्छता

गौतम बचुटे । केज 

केज तालुक्यातील झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुक निकालात महाविकासआघाडी आणि भाजपा यांच्यात अर्धे-अर्धे संख्याबळ झाले असून आघाडी व युतीच्या वतीने  आमचीच सरशी असल्याचे दावे-प्रतिदावे प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहेत. मात्र काही ग्रामपंचायतीनी सावध पवित्रा घेत आपण या दोन्ही गटापासून तटस्थ असल्याचे दर्शविली आहे. तर पैठण येथील ग्रामपंचायत निवडून आलेल्या ग्रामपंचायतच्या नवनिर्वाचित सदस्यांनी गावात पोहोचताच हातात झाडू घेऊन ग्रामस्वच्छता करण्यास सुरुवात केली.

 


या बाबतची माहिती अशी की, तालुक्यातील झालेल्या २३ ग्रामपंचायती पैकी चार ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध झाली. त्यातील प्रत्येकी दोन-दोन ग्रामपंचायती या महाविकास आघाडी आणि भाजपा यांच्या ताब्यात गेल्या आहेत. उर्वरित १९ ग्रामपंचायतीच्या झालेल्या निवडणुकीत निवडणुकीचे निकाल जाहीर झाले. त्यापैकी अर्ध्या-अर्ध्या ग्रामपंचायती या राष्ट्रवादी-सेना- काँग्रेसच्या महाविकास आघाडी आणि भाजपा युतीच्या ताब्यात गेले आहेत. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने काढलेल्या प्रसिद्धी पत्रकात १४ ग्रामपंचायती या राष्ट्रवादीच्या ताब्यात आल्या असल्याचे प्रसिद्ध करण्यात आले आहे. तर भाजप ने एक प्रसिद्धी पत्रक काढले असून १२ ग्रामपंचती या भाजपाच्या ताब्यात आल्याचे जाहीर केले आहे तसेच सेनेच्या वतीनेही तीन ग्रामपंचायतीवर भगवा फडकला असल्याचे म्हटले आहे. त्याच बरोबर काही ग्रामपंचायतीच्या प्रमुखांनी अत्यंत सावध पवित्रा घेत दोन्ही पासून तटस्थ असल्याचे म्हटले आहे.

दरम्यान केज तालुक्यातील पैठण (सावळेश्वर) येथील निवडून आलेल्या स्थानिक विकास आघाडीच्या व पाणी फाउंडेशनमध्ये सहभागी असलेल्या नवनिर्वाचित विजयी सदस्यांनी निवडून आल्या नंतर गावात प्रवेश करताच सर्वांनी हातात झाडू घेऊन गावातील रस्ते साफ-सफाई करीत ग्रामस्वच्छेतेच्या कामाला सुरुवात केली.


No comments