Breaking News

शेतकऱ्यांनी तूर विक्रीसाठी घाई न करता तात्काळ ऑनलाईन नोंदणी करावी - तालुकाध्यक्ष अण्णासाहेब चौधरी


आष्टी :  खरीप हंगाम 2020 -21 मध्ये तुरीचे पीक मोठ्या प्रमाणावर झाले आहे व आपल्या पिकाला योग्य भाव मिळण्यासाठी  नाफेड संस्थेमार्फत शासनाने शासकीय हमी भाव केंद्र सुरू केली आहेत शेतकऱ्यांनी विनाकारण तूर विक्रीची घाई करून आपले नुकसान करून घेऊ नये, साईदत्त सर्वसाधारण सहकारी संस्थेचे कासारी येथील शासकीय हमीभाव केंद्रात व शिराळ,मंगरूळ, कडा या ठिकाणच्या शासकीय तुर खरेदी केंद्रावरतीही शेतकऱ्यांनी  आवश्यक त्या कागदपत्रासह ऑनलाईन नोंदणी करून घ्यावी असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष अण्णासाहेब चौधरी यांनी केले आहे.

    साईदत्त सर्वसाधारण सहकारी संस्थेचे कासारी येथील शासकीय हमीभाव केंद्रात ऑनलाइन नोंदणी सुरू झाली असून लवकरच तुर खरेदी सही सुरुवात होणार आहे तुरीला शासकीय हमीभाव 6000 प्रति क्विंटल प्रमाणे जाहीर झाला असून आष्टी तालुक्यातील व परिसरातील शेतकऱ्यांनी शासकीय केंद्रावर आपले तुर विक्री करावी गेली एक महिन्या पासुन शेतकरी आपल्याकडील तुर  कवडीमोल भावाने म्हणजे 4500 ते 5000 रुपये प्रतिक्विंटल ने विक्री करत आहे.

त्यामुळे शेतकऱ्यांना प्रति क्विंटल 700 ते1000 हजार रुपये तोटा सहन करावा लागत आहे,  जानेवारीअखेरपर्यंत तुरीचे भाव शासकीय हमीभावा पेक्षा म्हणजेच प्रतिक्विंटल सहा हजार पाचशे ते सात हजार प्रति क्विंटल होण्याची शक्यता आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्याकडील तूर विक्रीची घाई करू नये , सातबारा ,8अ, पिक पेरा, आधार कार्ड , बँक पासबुक या आवश्यक  कागदपत्रासह तात्काळ शासकीय खरेदी केंद्रावर नोंदणी करून ठेवावी म्हणजे आपला तोटा होणार नाही तूर उत्पादक शेतकरी बंधूंनी  काडीकचरा नसलेला चाळणी करून माल खरेदी केंद्रावर आणावा व 12 पेक्षा जास्त आद्रता नसावी ऑनलाइन नाव नोंदणी साठी  खालील  व्यक्तींशी संपर्क साधावा रमेश तावरे  97 64 46 80 52  सागर चौधरी 950 39 83000 महेंद्र गोंदकर 820 82 77 182 यांच्याशी संपर्क साधून ऑनलाईन नोंदणी करावी असे आवाहन अण्णासाहेब चौधरी यांनी केले आहे.

No comments