Breaking News

संगम येथे जिजाऊ रत्न पुरस्कार वितरण सोहळा थाटात संपन्न


अ.भा.वारकरी मंडळाचे मराठवाडा विभागीय अध्यक्ष रामेश्वर महाराज कोकाटे यांच्या सुंदर नियोजनात झाला सोहळा

परळी :  राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेब यांच्या जयंतीचे औचित्य साधून अ भा वारकरी मंडळ व संगम ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ.वच्छालाबाई वैजनाथ कोकाटे  यांच्या संयुक्त विद्यमाने, संगम येथे , राजमाता जिजाऊ जयंती चे भव्य दिव्य  प्रमाणात आयोजन करण्यात आले  सकाळी 9:00 वाजता शिवश्री राजेभाऊ गिराम साहेब यांच्या हस्ते ध्योजारोहन करण्यात आले  तद्नंतर   जिजाऊ मासाहेब यांचे प्रतिमापूजन करून मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये जिजाऊ मा साहेबांच्या प्रतिमेची मिरवणूक काढण्यात आली,दिवसभर वेगवेगळ्या सांस्कृतिक कार्यक्रमांनी मासाहेबांची जयंती साजरी करण्यात आली, या जयंती सोहळ्यासाठी गावातील तरुणांनी अथक परिश्रम घेतले, छोट्या छोट्या  मुलींनी शोभायात्रे मध्ये,जिजाऊ मासाहेबांचा पोषाख परिधान करुन तसेच इतिहासातील वेगवेगळ्या पात्रांच्या पोशाख परिधान करून मिरवणुकीची शोभा वाढवली. सायंकाळी सात वाजता जिजाऊ रत्न पुरस्कार वितरण सोहळा अतिशय  थाटात संपन्न झाला.

जिजाऊ रत्न पुरस्कारासाठी परळी तालुक्यातील व बीड जिल्ह्यातील कर्तुत्वान अशा 16 महिलांची निवड करण्यात आली  वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये, सामाजिक राजकीय शैक्षणिक धार्मिक इत्यादी क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटवून, समाजामध्ये आदर्श  जीवन जगत असलेल्या 16 कतृत्वान महिलांना जिजाऊ रत्न पुरस्काराने  गौरव करण्यात आला  पुरस्काराचे वितरण परळी-वैद्यनाथ नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा सौ. सरोजनी ताई सोमनाथआप्पा हलगे व सौ.सुरेखाताई मेनकुदळे  यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आले पुरस्कार सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे ए.व्ही.माने डि.डी..कोकाटे साहेब,   नामवंत कीर्तनकार झी टॉकीज फेम भागवताचार्य श्री ह. भ. प. तुकाराम महाराज मुंडे शास्त्री , डॉक्टर राजाराम मुंडे, विलास ताटे, तलाठी साबणे,भोसले साहेब, साठे साहेब म.से.सं.अध्यक्ष पवार,बब्रुवान गिराम, प्रभाकर गिराम इत्यादी मान्यवरांची उपस्थिती होती. 

याप्रसंगी जिजाऊ चरित्रावर व्याख्यान देण्यासाठी, महाराष्ट्रातील नामवंत व्याख्यात्या तुकोबाराय साहित्य परिषदेच्या आंबेजोगाई तालुक्याच्या प्रमुख सौ. ज्योतीताई शिंदे यांना पाचारण करण्यात आले होते.आपल्या व्याख्यानातून ज्योतीताईंनी जिजाऊ मासाहेबांचा जन्मापासून ते जिजाऊ मा साहेबांच्या देहांत आतापर्यंतचा इतिहास अतिशय आक्रमकपणे, आणि वेगवेगळ्या आज्ञा पत्रांच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न केला. सौ ज्योतीताई शिंदे यांनी पुरस्कार प्राप्त सर्व भगिनींचे मनापासून कौतुक केले. जिजाऊ मासाहेबांच्या विचारांची प्रेरणा घेऊन,आपण आधुनिक समाजामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार करण्याचे कार्य करू असेही त्यांनी यावेळी बोलून दाखवले. खरेतर जिजाऊ मासाहेबांचा इतिहास सांगण्यासाठी चार दिवस ही कमी पडतील असेही ज्योतीताई म्हणाल्या.अत्यंत कमी वेळामध्ये प्रभावीपणे ओघवत्या शैलीमध्ये आपल्या रसाळ वाणीमध्ये अंगावर शहारे आणणारे व्याख्यान ज्योतीताईंच्या मुखातून संगम करांना ऐकावयास मिळाले.

जिजाऊ रत्न पुरस्काराच्या मानकरी ठरलेल्या महिला

माजी नगराध्यक्षा  राधाबाई मोहनलालजी बियाणी,नायब तहसीलदार सौ.क्षीतीजा वाघमारे, पांगरीच्या सरपंच सौ.अक्षदा सुशिल कराड, सौ.प्राजक्ता भाऊसाहेब कराड,सरपंच    सौ. गोदावरी राजाराम मुंडे,सौ.कमलबाई राठोड,डॉ.नेहा अर्षद शेख,सौ.शिल्पाताई अतुल रोडगे,सौ.स्वाती विलास ताटे,सौ.अन्नपुर्णाताई जाधव, सौ. वर्षाताई मगर, सौ. माधुरीताई विजय मुंडे, सौ. संगीता दत्ताञय चव्हाण, सौ. वर्षाताई बबन कोकाटे, सौ. चेतनाताई अजित गौर शेटे या सर्व महिलांचा आपापल्या क्षेत्रांमध्ये भरीव अशी कामगिरी केलेली आहे.या प्रत्येक महिलांचा सन्मानचिन्ह मानपत्र शाल श्रीफळ देऊन  गौरव करण्यात आला. मानपत्राचे वाचनही करण्यात आले. या पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी गावातील नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते. स्वागत गीत सुरेश मोगरे सरांच्या विद्यार्थिनींनी सादर केले, तर प्रस्ताविक रामेश्वर महाराज कोकाटे यांनी व्यक्त केले.


पुरस्काराला उत्तर देताना परळीच्या नायब तहसीलदार सौ. क्षीतीजा वाघमारे यांनी प्रत्येक पुरुषांमध्ये एक जिजाऊ असली पाहिजे आणि प्रत्येक स्त्रीमध्ये एक छत्रपती शिवाजी महाराज असले पाहिजे असे मत व्यक्त केले. सर्व पुरस्कार त्यांच्या वतीने हा वारकरी मंडळाच्या परळी शहर प्रमुख सौ मेनकुदळे यांनी उपस्थितांचे आभार मानले हा पुरस्कार देऊन समाजाने आमच्यावर फार मोठी जबाबदारी टाकलेली आहे त्या जबाबदारीला पात्र होण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत असेही सर्व पुरस्कार त्यांच्या वतीने त्यांनी आश्वासन दिले. पुरस्कार वितरण सोहळा यशस्वी करण्यासाठी बबन कोकाटे सुरेश मोगरे, मनोज गिराम, रूषी जाधव,कृष्णा गिराम, गणेश चव्हाण,  गावातील सर्व तरुणांनी खूप मनापासून सहकार्य केले. शेवटी आभार डी.डी.कोकाटे यांनी मानले.No comments