Breaking News

आष्टी येथे श्रीराम मंदिर उभारणी निधी संकलन कार्यालय स्थापन


आ. सुरेश धस यांनी दोन लक्ष तर माजी आ. भीमराव धोंडे यांनी दीड लक्ष रुपये निधी केला सुपुर्द 

आष्टी : श्रीराम जन्मभूमि श्रीक्षेत्र अयोध्या येथे मंदिर उभारणीसाठी निधी संकलन समिती समर्पण अभियान स्थापन करण्यात आली असून या निधी समिती संपर्क कार्यालयाचे आ. सुरेश धस,माजी आ.भीमराव धोंडे यांच्या शुभहस्ते आष्टी येथील श्रीराम मंदिर दीनदयाळ भवन येथे उदघाटन करण्यात आला.निधी संकलन कार्यक्रमाप्रसंगी आ.सुरेश धस यांनी दोन लक्ष रुपये तर माजी आ.भीमराव धोंडे यांनी दीड लक्ष रुपयांचा निधी समितीकडे सुपुर्द केला आहे.

यावेळी श्रीधरपंत सहस्त्रबुद्धे, ॲड.वाल्मिक निकाळजे, लालासाहेब कुमकर, ॲड.बाबुराव अनारसे, श्यामराव भोजने, शंकर देशमुख, भारत मुरकुटे, संग्राम गलगटे यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते. श्रीराम मंदिर निधी अभियानांची सुरुवात संपूर्ण देशात सुरू झाली आहे.आष्टी तालुक्यातुन अयोध्या येथे होत असलेल्या भव्य दिव्य राम मंदिर उभारणीसाठी सर्व क्षेत्रातील नागरिकांनी सहभाग घेऊन  इच्छेनुसार मंदिर उभारणीसाठी निधी देण्याचे आवाहन श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र निधी समिती आष्टी यांच्यावतीने नागरिकांना करण्यात आले आहे. चला तर ..मग भव्य श्रीराम मंदिर निर्माणात आपला खारीचा वाटा उचलू या... असा नारा देत अनेक तरुण युवक निधी देण्यासाठी पुढे येत आहेत.


No comments