Breaking News

शिरूरमध्ये अवैध मुरुम वाहतुक करणारे दोन ट्रॕक्टर पकडले


शिरूर कासार :  शिरुर तालुक्यात मोठ्या प्रमाणात वाळुचा सुळसुळाट सुटला आहे.बऱ्याच दिवसाच्या विश्रातीनंतर शिरूर येथील बीड पांदी रस्त्यावर अवैध गौण खनिज मुरूम वाहतूक करताना दोन ट्रॅक्टर वर शुक्रवार ता 8 रोजी कारवाई करण्यात आली आहे.

गेल्या कित्येक दिवसापासुन तालुक्यातील गावामधुन आवैध वाळु व गौण खनिज वाहतुक होत आहे.बेकायदेशिर वाळु उपसा प्रकरणी वंचित आघाडीच्या वतीने निवेदनही देण्यात आलेले आहे.या होणाऱ्या बेकायदेशिर वाळु वाहतुकीमुळे  मोठ्या प्रमाणात रस्त्याची वाट लागलेली आहे. शुक्रवारी झालेल्या कारवाईतील सदरील ट्रॅक्टर हे शिरुर पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. सदरील कारवाई शिरुरचे तहसीलदार तथा प्रभारी जिल्हा पुरवठा अधिकारी श्रीराम बेंडे , नायब तहसिलदार शिवाजी पालेपाड , तलाठी शब्बीर पठाण,निळकंठ सानप, बर्डे,नेटके व वाहन चालक रणखांब यांनी केली आहे.

No comments