मूकनायकचा आदर्श घेऊन पत्रकारांनी अन्यायाविरुद्ध लेखणी चालवावी - प्रा.प्रविण फुटके
यावेळी लक्ष्मण वैराळ यांनी भारतातील वर्तमानपत्रांचा इतिहास सांगून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या लोकोपयोगी पत्रकारितेवर प्रकाश टाकला. मराठीतील आद्य वर्तमानपत्र बाळशास्त्री जांभेकरांचे दर्पण मानले जाते परंतु हे वर्तमानपत्र ६ जानेवारी १८३२ रोजी सुरु झाले त्यापूर्वीच १८२८ साली मुंबापुर वर्तमान हे मराठी पत्र सुरु होते. याची जाहिरात बॉंबे गॅझेट आणि बॉंबे करिअर्सच्या अंकात मिळते. असे सांगून पत्रकार हा समाजाचा दिग्दर्शक असतो आपल्या लेखणीतून पत्रकारांनी नवसमाज घडवण्याचे कार्य करावे असे ते म्हणाले. यावेळी स्पर्धा परीक्षेद्वारे जयपाल कांबळे यांची एस.बी.आय. बँकेत निवड झाल्याबद्दल त्यांचा दै.दिव्यअग्नी चे संपादक प्रकाश सूर्यकर यांनी सत्कार केला.
तसेच परळी पञकार संघाचे शहराध्यक्ष प्रल्हाद कंडुकटले(दै.लोकप्रभा), तालुका अध्यक्ष बाबा शेख(दै.जंग),( दै.सम्राटचे) रानबा गायकवाड, (दै.सूर्योदयचे) प्रेमनाथ कदम,(दै.आनंदनगरीचे) माणिक कोकाटे, (दै.सिटीझनचे) शेख मुकरम,(बीड नेताचे) बालाजी ढगे,( दै.केसरी चे) काशीनाथ घुगे, ब्रम्हानंद कांबळे, (सा.जन सन्मान).प्रा.दशरथ रोडे, नवल वर्मा ,(दै.महाभारतचे) विकास वाघमारे , भारतीय बौद्ध महासभेचे सचिन रणखांबे, आकाश देवरे, ॲड.कपिल चिंडालीया, तिडके, गुट्टे,आदी उपस्थित होते.
No comments