Breaking News

आज महिलांसाठी वाण आरोग्याचे शिबीर लाभ घ्यावा: कमल निंबाळकर

बीड : राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने मकरसक्रांतीनिमित्त राष्ट्रवादी भवन येथे ३१ जानेवारी रोजी वाण आरोग्याचे या उपक्रमांतर्गत आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले आहे. या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्षा कमल निंबाळकर यांनी केले आहे.

राष्ट्रवादी महिला आघाडीच्या प्रदेश अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या आदेशावरुन तसेच पालकमंत्री धनंजय मुंडे ,आ.संदीप क्षीरसागर, जि.प.सदस्या रेखा क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली रविवारी (दि.३१)राष्ट्रवादी भवन येथे सकाळी ११ ते दुपारी २ वाजेपर्यंत आरोग्य तपासणी शिबीर होणार आहे. यावेळी स्त्रीरोग तज्ज्ञ,नेत्ररोग तज्ज्ञ यांच्याकडून तपासणी व उपचार केले जाणार आहेत. या शिबिराचा गरजू महिलांनी अधिकाधिक लाभ घ्यावा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्षा कमल निंबाळकर यांनी केले आहे. 


No comments