Breaking News

पिककर्जासाठी शेतकऱ्यांना अजून किती दिवस एसबीआय बँकेच्या वरिष्ठांमुळे त्रास सहन करावा लागणार? - धनंजय गुंदेकर


घाटसावळी एसबीआय शाखेअंतर्गत 250 शेतकऱ्यांना कर्जखाते उघडण्याअभावी पीककर्ज मिळेना, जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

बीड :  घाटसावळी येथील स्टेट बँक ऑफ इंडिया अंतर्गत 230 ते 250 शेतकऱ्यांचे पीककर्ज प्रकरणे संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करूनही प्रलंबित आहेत. याबाबत शेतकऱ्यांनी बँकेला कारणे विचारले असता सदरील शेतकऱ्यांचे कर्ज खाते न खोलल्यामुळे त्या शेतकऱ्यांना अद्याप कर्ज मंजूर होऊनही कर्ज रक्कम प्राप्त होऊ शकली नसल्याचे कळले. 

  खरीप पीककर्ज अद्याप मिळू शकलेले नाही, रब्बी पेरण्या देखील शेतकऱ्यांनी उसनवारी करून केलेल्या आहेत. शेतकरी बँकेत चकरा मारून अतिशय त्रस्त झालेले आहेत. एसबीआय बँकेचे वरिष्ठ अधिकारी दुर्लक्ष करत असून या दुर्लक्षामुळे शेतकऱ्यांना त्रास सहन करावा लागत असल्याचे धनंजय गुंदेकर यांनी म्हंटले आहे. 8 महिने शेतकऱ्यांना पिककर्जाची आशा लागलेली असून कृपया आपण लक्ष घालून तात्काळ शेतकऱ्यांना पिककर्जाचा लाभ मिळवून द्यावा अशी मागणी जिल्हाधिकारी श्री राहुल रेखावार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. आरडीसी श्री संतोष राऊत यांनी जिल्हाधिकारी यांच्या वतीने निवेदन स्वीकारले. यावेळी धनंजय गुंदेकर यांच्यासह उद्योजक संघाचे अध्यक्ष दत्ता जाधव, महेंद्र निसर्गंध, आकाश गुंदेकर, युवराज लाखे आदी उपस्थित होते.

No comments