Breaking News

आविष्कार गारमेंटसने जपली सामाजिक बांधिलकी : नीट परीक्षेत यश संपादन करणाऱ्या विटभट्टी मजुराच्या मुलीस केली आर्थिक मदत


'आविष्कार' च्या २४ व्या वर्धापन स्तुत्य उपक्रम  

माजलगाव :  शहरातील आविष्कार गारमेंटसच्या २४ व्या वर्धापन दिन व २५ व्या वर्षात प्रदार्पन दिनानिमित्त हालाकीची आर्थिक परिस्थिती असणाऱ्या विटभट्टीवर काम करणाऱ्या मजुरांच्या मुलीने निट परीक्षेत ५११ गुण घेऊन पास झाल्यामुळे २१०० रुपायांच्या आर्थिक मदतीसह ड्रेस देऊन गौरविण्यात आले.

माजलगाव शहरात गेल्या २४ वर्षांपासून आविष्कार गारमेंटसच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपत मनोहर दत्तात्रय घुले यांनी आनेक गरजुनां मदत केलेली आहे.दि ०१ जाने शुक्रवार रोजी आविष्कार गारमेंटसच्या २४ व्या वर्धापन दिन व २५ व्या वर्षात पदार्पना निमित्ताने आविष्कार गारमेंटसचे मालक मनोहर घुले यांनी माजलगाव शहरातील हालकीची आर्थिक परिस्थिती असणाऱ्या विटभट्टीवर काम करणाऱ्या कु.स्वाती राजेभाऊ भुंजगे या मुलींने निट परिक्षेत ५११ गुण घेऊन यश संपादन केल्याबद्दल २१००/ रुपये आर्थिक मदत व ड्रेस देऊन यथोचित सत्कार करुन आविष्कार गारमेंटसचा २४ वा वर्धापन दिन सामाजिक बांधिलकी जपत आगळ्या वेगळ्या पध्दतीने साजरा केला.

तसेच यावेळी व्यापारी महासंघाच्या वतिने अध्यक्ष सुरेंद्र रेदासणी यांनी सदर मुलीस २१००/ रुपायांची आर्थिक मदत केली, व आविष्कार ग्रुपच्या वतिने देखील सदर मुलीस १५००/ रुपायांची मदत केली.यावेळी व्यापारी महासंघाचे महासचिव सुनील भांडेकर, शशीकरण गडम,चंद्रशेखर घुले,गणेश लोहिया, जफर मिर्झा,गणेश राऊत व आशोक गोंडे यांची उपस्थिती होती.

No comments