Breaking News

सेवानिवृत्त शिक्षक माेतीराम भाेसले यांचे निधन


शिरूर कासार :
तालुक्यातील तरडगव्हण येथील सेवानिवृत्त शिक्षक माेतीरामदादा पाटील भाेसले (वय 83) यांचे बुधवारी दुःख निधन झाले. राञी ऊशिरा त्यांच्या पार्थिवावर शाेकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार आले. 

माेतीराम भाेसले  गुरूजी म्हणजे चाळीस वर्षापुर्वीचे आदर्श गुरूजी !  त्यांनी त्या काळी गाेरगरीब विद्यार्थांना स्व:च्या पगारातुन पाटी, पेनशील, वह्या, पुस्तके अन् शाळेचा गणवेश प्रत्येक वर्षी देत असत.  जर  एखा विद्यार्थी शाळेत आला नाही तर त्याच्या घरी जाऊन चाैकशी करून समजावून सांगुन त्या विद्यार्थास नियमितपणे शाळेत हजर राहण्यास भाग पाडत हाेते. आज त्यांच्या मुळे त्यांचे  हजाराे विद्यार्थी शासकीय सेवेत उच्च पदस्थ अधिकारी पदापासून ते शिपाई पदावर आहेत. 

पाटाेदा,  शिरूरकासार तालुक्यात साैताडा, डाेंगरकिन्ही, खालापुरी, लिंबा खांबा जिल्हा परिषदच्या शाळेत त्यांनी इमाने इतबारे सेवा केली. आदर्श व प्रामाणिक गुरुजी म्हणून त्यांच्या ख्याती होती.  त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, चार मुली, सुन, नातवंडे असा माेठा परिवार आहे. No comments