Breaking News

शिरूरच्या जिल्हा परिषद शाळेत महिला शिक्षणदिन उत्साहात


शिरूर कासार :
येथील जिल्हा परिषद माध्यमिक शाळेत दिनांक- 3 जानेवारी 2021रोजी सावित्रीबाई फुले जयंती निमित्त "महिला शिक्षण दिन उत्साहात साजरा करण्यात आला.सदरील कार्यक्रम साजरा करण्यासाठी चित्रकला स्पर्धा  वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, एकांकिका  स्पर्धा आशा विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सदरील उपक्रमास विद्यार्थ्यांचा उत्तम प्रतिसाद होता.

सदरील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रशाळेचे मुख्याध्यापक श्री अंकुश शिंदे तर प्रमुख पाहुणे म्हणून गटशिक्षणाधिकारी जमीर शेख, व्यवस्थापन समिती चे उपाध्यक्ष युवराज सोनवणे, शिक्षण प्रेमी बाळू बोराडे उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमा पूजनाने करण्यात आली व विद्यार्थ्यनी महिला शिक्षिका व प्रमुख पाहुणे यांचा सत्कार केला. सदरील कार्यक्रमात विद्यार्थी शिक्षक व प्रमुख पाहुणे यांनी 'स्त्री शिक्षणाचे महत्त्व व सावित्रीबाई फुले'या विषयावर मनोगत व्यक्त करून सावित्रीबाई फुले यांच्या यांच्या कार्याविषयी एक पुस्तक वाचण्याचा संकल्प केला.

विविध स्पर्धेत विद्यार्थ्यनी पुढील प्रमाणे प्रावीण्य मिळवले.


वक्तृत्व स्पर्धा


छोटा गट


1 कोल्हे श्रेयस

2 अक्षरा भिसे

3 वैष्णवी बागडे


मोठा गट


1 पुजा काटे

2 निकिता चांदणे

3 मारिया पठाण


चित्रकला स्पर्धा


1 ऋतुजा खेडकर

2 संस्कार मुरकुटे

3 शितल भालेराव


निबंध स्पर्धा


1 अनुष्का भालेराव

2 सायली गाडेकर

3 मुस्कान पठाण

तसेच सदरील कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी चंदा धाबे,द्वारका पालकर,शांताबाई तावरे,संगिता दहिफळे, अरुणा ढगे, वंदना गाडेकर,संध्या नागरे,लक्ष्मण पुरी,भिवसेन पवार,दत्ता गाडेकर,भगवान खेडकर,अण्णा गवळी,प्रल्हाद गायकवाड यांनी परिश्रम घेतले. तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सायली गाडेकर व ऋतुजा खेडकर ने केले तर आभार पूजा काटे ने मानले.

No comments