Breaking News

अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या अंधेरी,मुंबई शाखेचे उद्घाटन


शिरूर कासार : अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या अंधेरी,मुंबई येथील शाखेमध्ये मार्गशीर्ष शुक्रवार दि.८ जानेवारी २०२१ रोजी गणेश पूजन करून ऑफिस सुरू करण्यात आले.

यावेळी अध्यक्ष मेघराज राजेभोसले, उपाध्यक्ष विजय खोचिकर, प्रमुख कार्यवाह सुशांत शेलार,सह कार्यवाह चैत्राली डोंगरे,संचालिका वर्षा उसगावकर,संचालक पितांबर काळे,सतीश रणदिवे,संजय ठुबे,ज्येष्ठ दिग्दर्शक रमेश साळगांवकर, वेस्टर्न इंडिया फिल्म प्रोड्युसर असोसिएशनचे जनरल सेक्रेटरी दिलीप दळवी,दिग्दर्शक रामदास तांबे,अभिनेते व निर्माते किरण कुडाळकर, दिग्दर्शक जय तारी, निर्मिती व्यवस्थापक कृष्णा शेलार,निर्माते उदय साटम,बाळा पांचाळ,अजमत खान आदी मान्यवर तसेच महामंडळाचे स्टाफ विशाल पवार,हेमंत परब,गीता परब,गणेश बहादूर उपस्थित होते.याप्रसंगी निर्माते उदय साटम,बाळा पांचाळ व परभणी चे निर्माते अजमत खान यांनी पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या.अंधेरी शाखेप्रमाणे प्रभादेवी येथील शाखा चालूच राहणार आहे.

No comments