Breaking News

पत्रकारांनी समाजाला योग्य दिशा दाखवावी - पो.नि.सुरेश चाटे


लोकनेते गोपीनाथराव मुंडे पत्रकार भवन परळी येथे पत्रकार दिन संपन्न 

परळी  : पत्रकारांनी समाजाला योग्य दिशा दाखवावी असे प्रतिपादन संभाजी नगर पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक सुरेश चाटे यांनी आयोजित परळी शहर व तालुका पत्रकार संघाच्या वतीने दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जन्मदिवस पत्रकारदिन म्हणून दि.०६ जानेवारी २०२१ रोजी सकाळी ११.०० वा. लोकनेते गोपीनाथराव मुंडे पत्रकार भवन परळी येथे संपन्न झाला. यावेळी शहर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक खरात, वसंत मुंडे, ज्येष्ठ पत्रकार दिलीप बद्दर(दै.लोकाशा), संपादक प्रकाश सूर्यकर, जगन्नाथ सोळंके, गणपतअप्पा कोरे,न.प. सभापती किशोर पारधे, नगरसेवक केशव गायकवाड, अतुल दुबे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी नूतन कार्यकारिणीचे तालुकाध्यक्ष बाबा शेख, शहराध्यक्ष प्रल्हाद कंडुकटले यांनी मान्यवरांचे पुष्प गुच्छ देऊन स्वागत केले. 

     कार्यक्रमाच्या सुरुवातीला डॉ.बाबासाहेब आंबेडकर, तानूबाई बिर्जे आणि दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले. पत्रकारांनी पुराव्यानिशी बातम्या छापाव्यात. काल्पनिक व विनाकारण बदनामी करणाऱ्या बातम्या छापू नये. लोकशाहीचा चौथा स्तंभ असल्याने समाजातील प्रत्येक घटकाला न्याय द्यावा. यावेळी शहर उपाध्यक्ष माणिक कोकाटे (दै.आनंद नागरी), सचिव प्रकाश वर्मा, तालुका उपाध्यक्ष बालाजी ढगे (दै.बीड नेता), तालुका सचिव शेख मुकर्रम (दै.सिटीझन) तर सल्लागार प्रा.प्रवीण फुटके (दै.सकाळ), स्वानंद पाटील (दै.सामना), प्रेमनाथ कदम (दै.सूर्योदय),  ओमप्रकाश बुरांडे (दै.एकमत), जगदीश शिंदे (दै.गावकरी), ज्येष्ठ पत्रकार रानबा गायकवाड, भगवान साकसमुद्रे (जागृती न्यूज चॅनेल व दृष्टीकोन बीड न्यूज), सदस्य प्रा.दशरथ रोडे(दै.जनसन्मान), समीर इनामदार (दै.लोकपत्र), अमोल सूर्यवंशी (माजलगाव टाइम्स), निवृत्ती खाटीक(संपादक), विकास वाघमारे (दै.महाभारत), दै.सत्य साथी संपादक कपिल चिंडालिया, काशिनाथ घुगे, चंद्रमणी वाघमारे, सचिन वंजारे (साप्ताहिक शिक्षणमार्ग), ब्रम्हानंद कांबळे (परळी बुलेटिन), सय्यद अफसर (ऐलान), नितीन ढाकणे, प्रकाश वर्मा, रामचंद्र साबळे, दीपक गित्ते, नवल वर्मा, शेख सोहेल (लोकरत्न), शेख रईस, शेख मुदस्सीर (सरकार एक्सप्रेस) आदी पत्रकार यावेळी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन भगवान साकसमुद्रे यांनी केले तर उपस्थितांचे आभार प्रेमनाथ कदम यांनी मानले.

No comments