Breaking News

ग्रामपंचायत मतदानाच्या पार्श्वभूमीवर शांतता राखा - सपोनि अनिल गव्हाणकर

दिंद्रुड : माजलगाव तालुक्यातील दिंद्रुड पोलीस हद्दी अंतर्गत पाच ग्रामपंचायत ची निवडणूक मतदान प्रक्रिया उद्या दिनांक 15 रोजी संपन्न होणार असून या काळात  शांतता राखण्याचे आवाहन दिंद्रुड पोलीस स्टेशनचे सपोनि अनिल गव्हाणकर यांनी केले आहे. 

दिंद्रुड पोलीस हद्दीतील दिंद्रुड, नित्रुड, मोगरा, भोपा व कासारी या ग्रामपंचायत ची निवडणूक मतदानाची प्रक्रिया उद्या दिनांक 15 रोजी होणार आहे.मतदान केंद्राच्या आवारात विनाकारण फिरणे, विनाकारण जमाव जमवणे, गोंधळ घालणे, अचार संहिता नियमांचे उल्लंघन असे कायदा व सुव्यवस्था बिघडविण्याचे काम करणाऱ्यांवर दिंद्रुड पोलिसांची कडक नजर असणार असून कायद्याच्या चौकटी बाहेर जाणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे दिंद्रुड पोलीस स्टेशनचे सपोनि अनिल गव्हाणकर यांनी प्रसिद्धी माध्यमांना सांगितले आहे.


No comments