Breaking News

प्रजासत्ताक दिनानिमित्त भव्य सायकल रॅली!

शिरूर कासार : स्वच्छ सर्वेक्षण 2021 माझी वसुंधरा अभियान अंतर्गत शिरूर कासार नगरपंचायत व सोशल  लॅब इन्व्हरमेंट सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड, औरंगाबाद च्या वतीने दि.26 जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त नगरपंचायत शिरूर कासार या ठिकाणी भव्य सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले ठीक 7:30 वाजता नगरपंचायत येथे ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला त्यानंतर ठीक 8:00 वाजता भव्य सायकल रॅलीची सुरुवात करण्यात आली सायकल रॅली चे सुरुवात नगरपंचायत शिरूर कासार येथून सुरुवात करण्यात आली तसेच गांधी चौक, छत्रपती संभाजीराजे चौक, मेन रोड ते कालिकादेवी महाप्रवेशद्वार याठिकाणी सायकल रॅली समाप्त झाली. सायकल रॅलीच्या माध्यमातून शिरूर कासार नागरिकांना  स्वच्छतेविषयी जनजागृती करण्यात आली.

 

या वेळी कार्यक्रमास उपस्थित नगर पंचायत शिरूर कासार चे प्रथम नगराध्यक्ष रोहिदास पाटील , सुनील पाटील , दत्ता पाटील माजी उपनगराध्यक्ष बाबुराव झिरपे,गटनेते नशिर भाई शेख , आनंद जावळे , नगरसेवक बाजीराव सानप,अरुण भालेराव व नगरसेविका तसेच मुख्याधिकारी किशोर सानप,लेखापाल चंद्रकांत दामोदर , अफसर शेख , नामदेव घुगे , संजय गायकवाड  व नगरपंचायत कर्मचारी तसेच कालिकादेवी महाविद्यालयाचे मुख्याध्यापक श्री आप्पासाहेब येवले सर व सर्व शिक्षक तसेच विद्यार्थी व विद्यार्थिनी यांनी भव्य सायकल रॅली मध्ये सहभाग घेतला. तसेच यावेळी सोशल लॅब,औरंगाबाद टीमचे गौतम बोरसे, बालाजी कदम, भूषण बंडे, गणेश गोरमाळे आदी उपस्थित होते.


No comments