Breaking News

व्हरकटवाडी च्या पिडीत कुटूंबाला समाजकल्याण सभापतींची सांत्वनपर भेट

दिंद्रुड : धारूर तालुक्यातील व्हरकटवाडी येथील आभिमान बालासाहेब व्हरकटे (वय २३ वर्ष)या युवकाचे नुकतेच दुर्धर आजाराने निधन झाले.अभिमान ला हृदयाचा दुर्मीळ आजार होता. घरातील कर्ता पुरुष गेल्याने व्हरकटे कुटुंबावर आभाळ कोसळले आहे. 

येथील सरंपच प्रतिनिधी राम व्हरकटे यांच्या विनंतीवरून बीड जिल्हा समाज कल्याण सभापती कल्याण आबुज यांनी व्हरकटवाडीला देत  व्हरकटे कुटुंबास  बीड जिल्हा परिषद समाज कल्याण विभागा अंतर्गत पिठाची चक्कीसाठी शिफारस पत्र व शेळी पालनासाठी आर्थिक मदतीचे पञ दिले या प्रसंगी धारुरचे माजी नगराध्यक्ष माधव यांनी मयताच्या लहान भावास नोकरी देत व्हरकटे कुटूंबास आर्थिक हातभार लावला या प्रसंगी सरपंच रामकिशन व्हरकटे,निळकंठराव गडदे,रंजित रूपनर,संतोष शिंदे,बाबाराजे करे उपस्थित होते.


No comments