Breaking News

आष्टी नगरपंचायतच्या जन माहिती अधिकार्‍याला राज्य माहिती आयोगाचा पाच हजार रुपये दंड- कैलास दरेकर

आष्टी : प्रस्तुत प्रकरणात अपील आर्थी यांच्या माहितीचा अर्ज दिनांक 9/7/२०१८  रोजीचा या अर्जाद्वारे नगरपंचायत आष्टी यांच्याकडे अपील आर्थी कैलास दरेकर यांनी शौचालय प्रकरणाची माहिती मागवली होती . नगरपंचायत आष्टी यांनी कैलास दरेकर यांना माहिती न दिल्याने कैलास दरेकर यांनी राज्य माहिती आयोग खंडपीठ औरंगाबाद यांच्याकडे अपील सादर केले सदर अपिलावर आयोगाने दिनांक 25 .10 . 2018 रोजी सुनावणी घेऊन आदेश पारित केला सुनावणीदरम्यान जन माहिती अधिकारी यांनी अधिनियमातील कलम 7(1) भंग केलेला आहे त्यामुळे त्यांच्या विरुद्ध अधिनियमातील कलम २० मधील तरतुदीनुसार कारवाई का करण्यात येऊ नये याचा खुलासा तीस दिवसात प्रत्यक्ष उपस्थित राहून करावा.

 सदर खुलासा आयोगास प्राप्त न झाल्यास आयोग या बाबत एकतर्फी निर्णय घेईल संदर्भीय निर्णयांमध्ये आदेशित केल्याप्रमाणे संबंधित जन माहिती अधिकारी यांनी त्यांचा खुलासा आयोगाकडे सादर केला असल्याचे दिसून आले नाहीसंबंधित जन माहिती अधिकारी यांनी या प्रकरणी आयोगाकडील निर्णय व निर्देशांक कडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं असून माहिती अधिकार अधिनियम 2005 या कायद्याकडे बघण्याचा त्यांचा दृष्टीकोण पुरता नकारात्मक असल्याचं यावरून स्पष्ट दिसून येत आहे.

  यांनी अपील आर्थी यांनी मागवलेली शौचालय लाभार्थी यांच्या संदर्भातील आठच्या प्रति मुदतीत न दिल्याने माहिती अधिकार अधिनियम 2005 मधील कलम 7 (1) चा भंग झाला असल्यामुळे माहिती अधिकार अधिनियम 2005 मधील कलम 20(१) नुसार संबंधित जन माहिती अधिकारी शिक्षेस पात्र ठरत आहेत असा आयोगाचा निष्कर्ष आहे त्याअर्थी सदर अधिनियमातील कलम 19 (८)(क) अन्वये राज्य माहिती आयोगास प्राप्त झालेल्या अधिकारान्वये संबंधित जन माहिती अधिकारी नगरपरिषद कार्यालय आष्टी यांना प्रस्तुत प्रकरणी 5000 रुपये इतकी शास्ती अंतिम करण्याचा निर्णय आयोगाने केला आहे जबाबदार जनमाहिती अधिकारी यांचे नाव निश्चित करून त्यांच्याकडून शास्तीची रक्कम वसूल करून शासनाला भरावी याची जबाबदारी कलम 19 (८)(क)व१९(७) अन्वये राज्य माहिती आयोग आणि जिल्हाधिकारी बीड यांच्यावर निश्चित केलेली आहे संबंधित आपील आर्थी कैलास दरेकर यांच्या पाठपुराव्याला यश आल्याचं सकृतदर्शनी दिसून येत आहे.


No comments