Breaking News

.... अन्यथा आम आदमी पार्टी बीड शहरातील रखडलेल्या रस्त्याच्या चिखलात बसून धरणे आंदोलन करणारनगरपरिषद रखडवलेल्या विकासाकामांना गती का देत नाही? आम आदमी पार्टीचा मुख्याधिकाऱ्यांना सवाल

आपच्या शिष्टमंडळाने शहरातील नागरिकांसह मुख्याधिकाऱ्यांना दिले निवेदन

बीड :  शहरात जागोजागी विकासकामे रखडली आहेत, या रखडलेल्या कामांकडे नगरपरिषद दुर्लक्ष करत आहे. रस्त्याची कामे व इतर कामे अडवणाऱ्यांना कसल्याही प्रकारे पायबंद घातला जात नाही. इमामपूर रोड व बार्शी नाक्यावर बीडकरांचे जगणे मुस्किल झाले आहे. 

मात्र सत्ताधारी अन विरोधक याकडे साफ दुर्लक्ष करताना दिसत आहेत. काल सोमवार रोजी आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष अशोक येडे व नागरिकांच्या शिष्टमंडळाने मुख्याधिकाऱ्यांची भेट घेत तक्रारीचा पाढाच वाचला. रस्त्याच्या कामामुळे पाणीपुरवठा पाईपलाईन बंद आहेत, काही ठिकाणी फुटल्या आहेत, प्रचंड पाणी संपूर्ण रस्त्यावर साचते, दुर्गंधी पसरली आहे. या परिसरात लोकांना होणाऱ्या त्रासाबाबत सर्व माहितीही देत स्वतः मुख्याधिकारी यांनी भेट देऊनही प्रश्न निकाली निघत नसेल तर 2 दिवसांनी आम आदमी पार्टी बीडकरांसाठी इमामपूर रोडवर रखडलेल्या रस्त्याच्या चिखलात बसून धरणे आंदोलन करणार असल्याचा इशारा आम आदमी पक्षाचे जिल्हाध्यक्ष अशोक येडे यांनी निवेदनाद्वारे दिला आहे. यावेळी जिल्हाध्यक्ष अशोक येडे, रामधन जमाले, मिलिंद पाळणे, बीड शहरातील सुरेखा कडवकर, कमल कदम, शारदा रोहिटे, सावित्रीबाई घाडगे, कुसुम घोडके आदींची उपस्थिती होती.

No comments