Breaking News

मूकनायक दिन आणि दर्पण दिनानिमित्त उद्या केजमध्ये पत्रकार पुरस्कार वितरण


गौतम बचुटे । केज 

येथे मूकनायक दिन व दर्पण दिना निमित्त पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनिय बातम्या आणि बातम्यांचा मागोवा घेणाऱ्या पत्रकारांचा एस एम देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत जिवनगौरव व विविध पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येणार आहे.

या बाबतची माहिती अशी दि.३१ जानेवारी रोजी केज येथे की, आदर्श पत्रकार समितीच्या वतीने मागील १८ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात  उल्लेखमीय व भरीव कामगिरी करणाऱ्या पत्रकारांच्या कार्याचा त्यांना पुरस्कार देवुन गौरव करण्यात येतो. जेष्ठ पत्रकरांची निवड समिती वर्षभर केलेल्या कामांचे मूल्यांकन करून त्यांच्या नावांची घोषणा केली जाते. या वर्षी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सन १९२० रोजी सुरू केलेले मूकनायक व बाळशास्त्री जांभेकर यांनी सुरु दर्पण मासीक या निमित्त मूकनायक दिन व दर्पण दिन साजरा करण्यात येत आहे. पुरस्कार प्राप्त पत्रकारांना मराठी पत्रकार परिषदेचे विश्वस्त माननीय एस. एम. देशमुख यांच्या शुभहस्ते आणि सामाजिक क्षेत्रातील झुंबरलाल खटोड प्रतिष्ठानचे मा. गौतमजी खटोड यांच्या अध्यक्षतेखाली आणि जिल्हा माहिती अधिकारी किरण वाघ भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे अध्यक्ष ऍड अजित देशमुख, मराठी पत्रकार परिषदेचे सचिव बापूसाहेब गोरे प्रसिद्ध वात्रटिकाकार प्रा. सत्यप्रेम लगड, मराठी पत्रकार परिषदेचे बीड जिल्ह्याचे अध्यक्ष सुभाष चौरे,  मराठी पत्रकार परिषदेचे प्रसिद्धी प्रमुख अनिल महाजन, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते प्रा. हनुमंत भोसले,  अधिस्वीकृती समितीचे सदस्य अनिल वाघमारे, जिल्हा कार्याध्यक्ष दत्तात्रय आंबेकर हे प्रमुख अतिथी आहेत. कार्यक्रमाला उपविभागीय पोलिस अधिकारी भास्कर सावंत, नगर परिषदेचे प्रभारी मुख्याधिकारी सुहास हजारे, पोलीस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन, तालुका कृषी अधिकारी भगत साहेब, वैद्यकीय अधीक्षक डॉ. राउत साहेब, सपोनि आनंद झोटे, गटविकास अधिकारी दत्तात्रय दराडे, गट शिक्षणाधिकारी सुनील केंद्रे, उप अभियंता विलास कांबळे, वीज वितरणचे अभियंता आंबेकर साहेब, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता खेडकर साहेब आणि रोटरीचे प्रांतपाल दादासाहेब जमाले यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम सोहळा संपन्न होत आहे. स्वागत समारंभाचे अध्यक्ष आदर्श पत्रकार संघाचे अध्यक्ष विजयराजजी आरकडे हे भूषवित  आहेत.

या पुरस्कार सोहळ्याला राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, कृषी व साहित्य क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आदर्श पत्रकार समितीचे सर्व पदाधिकारी परिश्रम घेत असून हा कार्यक्रम शिक्षक पतसंस्थेच्या इमारतीत सायं.६:०० वा. संपन्न होत आहे. सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

पुरस्कार प्राप्त पत्रकार : -

जेष्ठ पत्रकार विजय हमीने - जिवन गौरव पुरस्कार

उत्तम हजारे - आदर्श पत्रकार पुरस्कार

अभिमन्यू घरत - आदर्श संपादक पुरस्कार

उदय नागरगोजे - आदर्श युवा पुरस्कार

उमेश जेथलिया - स्व. पत्रकार सुनिल देशमुख स्मृती आदर्श निर्भीड पुरस्कार

मनोज गव्हाणे - स्व मोहन भोसले स्मृती आदर्श शोध पत्रकारिता पुरस्कार आणि कोरोना काळात  स्वतःचा जीव धोक्यात घालून काम करणारे तहसीलदार दुलाजी मेंढके व तालुका आरोग्य अधिकारी डॉ विकास आठवले यांना आदर्श सेवा पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.


No comments