Breaking News

आष्टीत सर्व धर्मीय विद्यार्थांसाठी नवोदय पूर्व तयारी व स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन केंद्राची सुरुवात


z

के. के. निकाळजे । आष्टी   

बीड जिल्हयातील आष्टी येथील मदरसा इस्लामिया दारूल उलूम , मोगलपुरा येथे सर्वधर्मीय विद्यार्थांसाठी मोफत नवोदय एन्ट्रान्स कोचिंग , स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन केंद्र सुरू करण्याचा स्तुत्य उपक्रम हाती घेण्यात आला आहे . ग्रामीण विद्यार्थ्यांच्या सर्वांगीन विकासासाठी सुरु होत असलेल्या या सेंटर मध्ये अभ्यासिका , सुसज्ज ग्रंथालय , प्रशिक्षित तज्ञ शिक्षक , स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन व सराव तसेच सर्व स्तरातील विद्यार्थांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

     ग्रामीण विद्यार्थांना मार्गदर्शन व योग्य दिशा देऊन त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याची खुप आवश्यकता आहे . या बाबीचा विचार करून आष्टी व परिसरातील विद्यार्थ्यांसाठी सुरु होणारे हे केंद्र नक्कीच त्यांना उज्ज्वल भविष्यासाठी प्रेरक ठरणार आहे . आष्टी सारख्या ग्रामीण ठिकाणी सामाजिक कार्यकर्ते व मुस्लीम धर्मगुरूंच्या पुढाकारातुन होत असलेल्या या स्तुत्य उपक्रमाने आष्टी तालुक्याला नवी दिशा मिळेल . असा विश्वास पुणे येथील सुप्रसिद्ध अनिस ॲकॅडमी चे संचालक अनिस कुट्टी सर यांनी व्यक्त केला . आष्टी येथे आयोजित विद्यार्थी मार्गदर्शन शिबीर प्रसंगी ते बोलत होते . या प्रसंगी उपस्थित विद्यार्थ्यांचे एस पी आय परिक्षेचे अर्जही भरण्यात आले . ग्रामीण भागातुन उच्च पदस्थ अधिकारी घडावेत व त्यांच्या हातुन देश सेवा व्हावी या उद्देशाने सुरु होत असलेल्या मदरसा इस्लामिया दारूल उलूम आष्टी च्या या स्तुत्य उपक्रमाचे अनिस सर यांनी कौतुक केले व या कामी अनिस अकॅडमी सर्वोतपरी सहकार्य करेल असे सांगीतले. यावेळी आष्टी व परिसरातील विद्यार्थी , पालक व सामाजिक , शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.





No comments