Breaking News

आदिवासी महिलेवर बलात्कार


केज तालुक्यातील संतापजनक घटना : नराधमावर बलात्कारासह  ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

  

गौतम बचुटे । केज

 एका आदीवासी समाजातील २२ वर्षीय विवाहित महिलेचा नवरा घरी नसताना तिचे तोंड दाबून हाताला धरून ओढीत नेऊन शेतात बलात्कार केल्याची  घटना केज तालुक्यात घडली. याप्रकरणी पीडित महिलेच्या तक्रारीवरून नराधम आरोपी विरुद्ध बलात्कारासह ॲट्रॉसिटीचा गुन्हा  पोलिसात दाखल करण्यात आला आहे. 

या बाबतची माहिती अशी की,  केज तालुक्यातील डोणगाव येथील शेतात आदिवासी कुटुंब राहत आहे. दि २८ डिसेंबर रोजी रात्री ९:०० ते ९:३० वा. दरम्यान बाळू वैजनाथ घुले याने पीडित महिलेचा पती घरी नसल्याची संधी साधून तिच्या घराची कडी वाजविली. पिडितेने तिचा पती आला आहे असे समजून दार उघडले. दार उघडताच त्या नराधमाने तिचा नवरा कुठे गेला? असे विचारले. तिने तिचा नवरा शेतात पिकाला पाणी देण्यासाठी गेला आहे. असे सांगितले; त्या नंतर त्याने त्याला ती आवडते. असे म्हणून शरीर सुखाची मागणी केली. तिने नकार देताच; त्या नराधमाने तिचे तोंड दाबून तिच्या हाताला धरून जवळच असलेल्या अभिमान चौरे याच्या शेतात ओढत नेऊन तिच्यावर बलात्कार केला. तसेच हा प्रकार कुणाला सांगितल्या तिच्या नवऱ्यासह तिला व मुलांना मारून टाकण्याची धमकी दिली.

या प्रकरणी पीडित आदिवासी महिलेच्या तक्रारी नुसार दि. ३ जानेवारी २०२१ रोजी केज पोलिस स्टेशनला बलात्कार, ॲट्रॉसिटीचा आणि जिवे मारण्याची धमकी या अपराधा वरून  गु. र. नं. ०५/२०२१  भा. दं. वि. ३७६ (१), ५०६ यासह अनुसूचित जाती जमाती अन्याय अत्याचार प्रतिबंधक कायदा कलम३ (१) (डब्ल्यू) (i) (ii), ३ (२) (पाच) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी भास्कर सावंत हे करीत आहेत.

No comments