Breaking News

मकर संक्रांती निमित्त बाजारात महिलांची गर्दी


शिरूर कासार : मकर संक्रांतीचा सण जवळ आला आहे. या सणाच्यानिमित्ताने खरेदी करण्यासाठी शिरूर कासारच्या आठवडी बाजारात महिलांची विशेष गर्दी पाहायला मिळाली. हा सन महिलावर्गात लोकप्रिय असल्याने आज महिला उत्साहाने खरेदी करत होत्या. 

महिलावर्गात मकर संक्रांत या सणाचे विशेष आकर्षण असते. या सणानिमित्त महिला नटून-थटून वान वाटण्याच्या निमित्ताने एकमेकींना भेटत असतात. मकर संक्रातीचा सण अवघ्या तीन दिवसांवर (दि.14)रोजी आला आहे. त्यामुळे आजच्या शिरूर कासारच्या आठवडी बाजारात शिरूर कासार शहरासह तालुक्यातील आसपासच्या खेड्यातील महिलांनी वान साहित्य आणि इतर खरेदीसाठी मोठ्या उत्साहाने गर्दी केली होती. लॉक डाऊन संपल्यानंतर प्रथमच बाजारामध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून आली.

No comments