Breaking News

सुस्वभावामुळे अतुल मेहेर यांनी सर्वांची मने जिंकली : किशोर हंबर्डे


 

आष्टी : आष्टी तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव,अतुल शेठ मेहेर यांचे वडील मनसुखलाल झुंबरलाल मेहेर यांनी आष्टी शहरात, पर्यायाने तालुक्यात व्यापाराची मुहूर्तमेढ रोवली. त्यांच्या पावलावर पाऊल टाकून अतुल शेठ मेहेर यांनी वडिलांचा वारसा जपला. सुस्वभाव, चांगुलपणा त्यांच्या अंगी साकारला म्हणूनच त्यांनी सर्वांची मने जिंकली. असे उद्गार संस्थाध्यक्ष किशोरनाना हंबर्डे यांनी काढले.


 

एडवोकेट बी.डी.हंबर्डे महाविद्यालयात आयोजित सचिव अतुल शेठ मेहेर यांच्या वाढदिवस सत्कार सोहळ्याचे अध्यक्ष म्हणून ते बोलत होते. प्रारंभी प्रा. ज्ञानेश्वर नवले यांनी प्रास्ताविक केले. अतुल यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन आणि केक कापून यथोचित सत्कार करण्यात आला.यावेळी प्राचार्य डॉ.सोपानराव निंबोरे, प्रा. डॉ. अभय शिंदे यांनी मनोगते व्यक्त केली. प्रमुख पाहुणे म्हणून दिलीप शेठ वर्धमाने उपस्थित होते. अतुल शेठ मेहर यांनी महाविद्यालयाला प्रिंटर भेट दिला. डॉ. सुहास गोपने, प्रा.अविनाश कंदले, प्रा. अशोक भोगाडे, प्रा. डॉ. सखाराम वांढरे, डॉ.  रवि सातभाई यांनी कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले. प्रा. डॉ. बाबासाहेब मुटकुळे सूत्रसंचालन केले.

No comments