Breaking News

भीमा कोरेगावच्या ऐतिहासिक लढाईत जुल्मी पेशवाईचा अंत झाला -रानबा गायकवाड

परळी :  एक  जानेवारी  1818  रोजी भीमा  कोरेगाव  येथे  झालेल्या ऐतिहासिक लढाईत जुल्मी आणि विषमतावादी व्यवस्था असलेल्या पेशवाईचा अंत झाला म्हणुनच विश्वरत्न  डाॅ. बाबासाहेब आंबेडकर भीमा  कोरेगाव विजय स्तंभाला 1927  पासून दरवर्षी  मानवंदना देत असत असे प्रतिपादन जेष्ठ पञकार व साहित्यिक रानबा गायकवाड यांनी केले. ते सम्राट अशोक नगर येथे आयोजित कार्यक्रमात बोलत होते. 

   भीमा  कोरेगाव ऐतिहासिक लढाईला  202  वर्ष पूर्ण झाले आहेत.  500  शूर  महार सैनिकांनी  28000  सैन्याचा पराभव केला होता.  हा दिवस शौर्य दिवस महणून साजरा केला जातो. त्या  निमित्त आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून युवा नेते भीमराव डावरे, रणवीर चक्रे, पञकार विकास वाघमारे ,सुबोध  भालेराव आदी उपस्थित होते.

    पुढे बोलताना रानबा गायकवाड म्हणाले की, भीमा कोरेगावचा विजय स्तंभ पूर्वजांच्या शौर्याचे प्रतिक आहे. या लढाईने गुलामगिरीचा अंत होण्यास सुरवात झाली. इंग्रजानी शूर महार सैनिकांची दखल घेऊन त्यांना मानवंदना म्हणून विजयसंत्भ बांधला. 

    या  कार्यक्रमास अशोक  नगर महिला मंडळातील महिला मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुगत मस्के, विजय चव्हाण, आशिष जोगदंड, विवेक कांबळे, विशाल डोंबे, संदीप चव्हाण, राकेश कांबळे, चंद्रकांत गायकवाड, समीर कासार, कल्याण सावंत, रूपेश गोडबोले, अर्जुन मस्के, प्रकाश मस्के, आनंद रोडे, अरविंद पडघने, गोविंद सुर्यवंशी, गौतम डावरे, शिवाजी वकील, लक्ष्मण कांबळे, आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सुञसंचलन विजय अटकोरे यांनी केले. कार्यक्रमाला महिला, पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments