Breaking News

परळी पंचायत समितीतील भाजपचे तीनही सदस्य राष्ट्रवादीत


पंचायत समितीत राष्ट्रवादीचे पुन्हा एकदा एकेरी वर्चस्व! तर भाजपचे संख्याबळ शून्य

परळी  : परळी पंचायत समितीच्या सभापती विरुद्ध आलेल्या अविश्वास ठरवादरम्यान भारतीय जनता पक्षाचे तीन सदस्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात दाखल झाल्याने आता भाजपच्या पंचायत समिती सदस्यांची संख्या शून्य झाली आहे!

12 सदस्यांची संख्या असलेल्या परळी पंचायत समितीच्या सभापती विरुद्ध अविश्वास ठराव संमत करण्यात आला होता. आज यावर मतदान झाले. मुळात 12 सदस्य असलेल्या परळी पंचायत समितीमध्ये धनंजय मुंडे यांच्या गटाचे 8 सदस्यांसह वर्चस्व आहे, त्यातच भाजपचे आणखी 3 सदस्य नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात दाखल झाले असल्याने आता पंचायत समितीच्या कार्यकारिणीत भाजपचे संख्याबळ शून्य झाले आहे! भाजपचा एक सदस्य आधीच अपात्र झाला आहे. दरम्यान सभापती पदावर अविश्वास ठराव संमत झाल्यानंतर नवीन पदांच्या निवडीसाठी पुन्हा एकदा सर्वसाधारण सभा आयोजित केली जाण्याचे चिन्ह आहेत.

No comments