Breaking News

दिलीपराव काळे यांच्या ६१ व्या जन्मदिवसानिमित्त सत्यपाल महाराजांचा कार्यक्रम
आष्टी :
कडा सहकारी साखर कारखान्याचे माजी कार्यकारी संचालक दिलीपराव काळे यांच्या ६१ व्या जन्मदिवसानिमित्त अभिष्टचिंतन सोहळा, स्नेहभोजन व राष्ट्रीय समाज प्रबोधनकार, सप्तखंजेरी वादक सत्यपाल महाराजांची सत्यवाणी हा कार्यक्रम फत्तेवडगाव ता.आष्टी येथे आयोजित केला आहे.

   


         आष्टी तालुक्यात 1980 पासून राजकीय, सामाजिक तथा धार्मिक कार्यात सक्रिय असणारे दिलीपराव यशवंतराव काळे यांनी संयमाने अंत्यत प्रतिकूल परिस्थितीवर मात करून आपली वेगळी ओळख निर्माण करत मोठा मित्र परिवार तयार केला आहे. फत्तेवडगाव हे त्यांचे मुळ गाव असून पाच भावंडांचा कुटुंब जेष्ठ बंधू आदर्श शिक्षक पी.वाय.काळे माजी केंद्रप्रमुख, लहान भावांपैकी झुंबर काळे हे पुणे येथे सिव्हिल इंजिनीअर म्हणून कार्यरत असून, जालिंदर काळे हे गावी शेती करतात तर सर्वात लहान बंधू नेव्ही मध्ये मेकॅनिकल इंजिनिअर म्हणून सेवानिवृत्त झाले असून सध्या पुणे येथे जहाँगिर हॉस्पिटलला जनरल मॅनेजर म्हणून उत्कृष्ट काम करत आहेत तसेच त्यांच्या पुढील पिढीत देखील सर्वच मुलं व मुली उच्चशिक्षित असून दिलीपराव काळे यांचा मुलगा तुषार काळे हे माजी आमदार भीमराव धोंडे यांचे स्वीय सहाय्यक आहेत तर मुलगी व जावई अमेरिकेत असून जावई निलेश कोरडे हे सॉफ्टवेअर इंजिनिअर आहेत, एक पुतण्या डॉ.विजय काळे अमेरिकेत शास्त्रज्ञ आहे, तर इतर कुटुंबातील सर्वच मुलं व मुली विविध ठिकाणी उच्चपदस्थ आहेत.

 तसेच दिलीपराव काळे यांनी नोकरीतून सेवानिवृत्त झाल्यानंतर आपले सामाजिक कार्य सुरू ठेवत फत्तेवडगाव ते पंढरपूर अशी प्रथम आषाढी एकादशीची पायी दिंडी गेल्या सहा वर्षांपासून सुरु केली असून स्वतः व पत्नी माजी सरपंच सौ.हेमलता काळे या पायी दिंडी सोहळ्यात सहभागी असतात. नुकतेच दोन वर्षांपूर्वी खा.छत्रपती संभाजी महाराजांच्या हस्ते शिवशंभो प्रतिष्ठान अहमदनगरचा आदर्श समाजरत्न पुरस्काराने दिलीपराव काळे यांना सन्मानित केलेले आहे.

               दिलीपराव काळे यांच्या ६१ व्या जन्मदिवसाच्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त फत्तेवडगाव ग्रामस्थांनी आज सायंकाळी ०४ ते ०६ वाजेपर्यंत स्नेहभोजन व ०६ वाजता राष्ट्रीय समाज प्रबोधनकार, सप्तखंजेरी वादक सत्यपाल महाराजांच्या सत्यवाणीचा कार्यक्रम आयोजित केला असून या कार्यक्रमासाठी राजकीय, सामाजिक, शैक्षणीक क्षेत्रातील अनेक मान्यवर तसेच मित्र परिवार, नातेवाईक, आप्तेष्ट उपस्थित राहणार आहेत.No comments