Breaking News

मोगऱ्यात परिवर्तन ग्रामविकास पॅनालच्या प्रचाराचा शुभारंभ ; तरुणांच्या विजयासाठी गावकऱ्यांनीच कसली कंबर


माजलगाव : तालुक्यातील मोठी ग्रामपंचायत असलेल्या मोगरा ग्रामपंचायतीच्या निवडणुकी प्रक्रियेला सुरवात झाली असून गावातील नव्या पिढीच्या सुशक्षित तरुणांनी परिवर्तन ग्रामविकास पॅनालची निर्मिती केली असून आज ग्रामदैवत असलेल्या खंडोबा मंदिरात नारळ वाढवून तरुणांनी प्रचाराचा श्रीगणेशा केला.

15 जानेवारी रोजी तालुक्यातील मोठी ग्रामपंचायत असा नावलौकिक असलेल्या मोगरा ग्रामपंचायती साठी मतदान होणार आहे एकूण 13 सदस्य असलेल्या या ग्रामपंचायत निवडणुकीसाठी गावातील सुशिक्षित तरुणांनी परिवर्तन ग्रामविकास पॅनाल उभा केला असुन या पॅनालचे वैशिष्ट्य म्हणजे  उमेदवार पदवीधारक व उच्च शिक्षित आहेत.आज दिनांक 7 रोजी गावचे ग्रामदैवत असलेल्या खंडोबा मंदिर,वाडीवरचा मारोती, शिवाजी नगर येथील मारोती मंदिर येथे प्रचाराचा नारळ वाढवून तसेच भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला.दरम्यान प्रचाराच्या शुभारंभाचे रूपांतर रॅलीत झाल्याने गावातील तरुणांचा उत्साह ओसंडून वाहत होता. मोगरा ग्रामपंचायत मोठी असूनही आतापर्यंत मूलभूत सुविधांपासून गावकरी वंचित राहिले आहेत.

गावात रस्ते, नाल्या,पाणीपुरवठा योजना, स्मशानभूमी,पथदिवे नसल्याने वर्षानुवर्षे गावकऱ्यांना प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागत आहे.अनेक निवडणुका झाल्या खूप जण सरपंचही झाले परंतु गावकऱ्यांना मूलभूत सुविधांपासून वंचित ठेवण्याचे पाप सत्ताधाऱ्याकडून झाल्याने गावकऱ्यात त्याच त्याच ठराविक सत्ताधारी मंडळी विरोधात प्रचंड संताप दिसून येत आहे. परिवर्तन ग्रामविकास पॅनालच्या माध्यमातून ताज्या दमाची नवी सुशक्षित पिढी गावाच्या राजकारणात उतरल्याने मोगरावासीयांना आतातरी मूलभूत सुविधा मिळतील अशी अपेक्षा गावकऱ्यांत निर्माण झाल्याचे दिसून येत आहे.परिवर्तन ग्रामविकास आघाडीचे एकूण दहा उमेदवार निवडणुकीच्या आखाड्यात उतरले असून छत्री, बँट,ट्रॅक्टर, नगारा या चिन्हावर मतदान करून सुशक्षित तरुणांच्या हातात गावची धुरा देण्याचे आवाहन परिवर्तन ग्रामविकास पॅनालच्या वतीने करण्यात आले आहे.

No comments