Breaking News

गावस्तरावर कुस्तीचे फड पुर्ववत चालू करुन पैलवानांना पाच हजार रुपये मानधन द्या- ; शिवसंग्रामचे सुधीर काकडे यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे मागणीबीड  : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आर्थिक संकटात सापडलेल्या पैलवानांना शासकीय मदत देण्यात यावी. तसेच गावस्तरावर कुस्तीचे फड पुर्ववत चालु करण्यात यावेत. अशी मागणी शिवसंग्रमाचे नेते सुधीर काकडे यांनी जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांना बुधवारी (दि.13) दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे. 

     दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की बीड जिल्ह्यात अनेक नामवंत पैलवान तयार होत आहेत. जिल्ह्यातील राहुल आवारे सारखे नामवंत पैलवानाने जगाला गवसणी घातलेली असून पोलीस दलात आज मानाच्या पदावर ते कार्यरत आहेत. पैलवानांचे संपूर्ण जीवनचर्या ही गावाकडील जत्रा व यात्रा मधील फडावर अवलंबून असते. मात्र फडातील कुस्तीवर मिळणार्‍या मिळकतीवर त्यांना आपली गुजरान करावी लागते. कोरोनाचे दाट सावट असल्याने गावात भरणार्‍या जत्रा-यात्रा बंद आहेत. त्यामुळे पैलवानांच्या फडातील कुस्ती बंद झाल्याने त्यांची आर्थिक ओढातान होत असून घर खर्च तर लांबच पण त्याच्या शरीरासाठी लागणारा खुराक घेणे सुद्धा त्यांना शक्य होत नसल्याचे श्री. काकडे यांनी म्हटले आहे. 

     बीड जिल्ह्यातून अनेक नामवंत मल्ल तयार झालेले असून त्यांची प्रेरणा घेऊन जिल्ह्यात अनेक मल्ल मेहनत घेत आहेत. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तालीम व यात्रा-जत्रात कुस्त्यांचे फड बंद असल्याने कुस्त्यांचा सराव करणार्‍या पैलवानांची आर्थिक घडी विस्कटली आहे. यामुळे  कुस्ती क्षेत्रात भविष्यात बीड जिल्ह्यातून अनेक नवीन पैलवान तयार होण्याच्या मार्गावर असताना त्यांची आर्थिक चणचण दूर करणे गरजेचे आहे. 

त्या अनुषंगाने आर्थिक अडचणीत सापडलेल्या पैलवानांना मासिक रुपये पाच हजार इतके मानधन शासनाकडून देण्यात यावे. तसेच त्यांच्यासाठी अनेक उपाययोजना शासनाने राबवाव्यात यासाठी रीतसर प्रस्ताव शासनाकडे पाठविण्याबाबत उचित कार्यवाही करण्यात येवून गावस्तरावरील याञा व जञाच्या माध्यमातुन कोरोनाचा प्रादुर्भाव होणार नाही अशा किमान अटी शर्तीवर कुस्तीचे फड पुर्ववत चालु करण्यात यावेत. अशी मागणी श्री. काकडे यांनी जिल्हाधिकार्‍यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी शिवसंग्रामचे नेते अनिल घुमरे, कुस्तीगिर परिषदेचे बीड तालुकाध्यक्ष बंडू शहाणे, जब्बार शेख, शेख इसाक, मकसूद पहेलवान, गोपीनाथ घुमरे, भागवतराव काकडे, नरेश पिवाळ, दत्ता सौंदरमल, नवनाथ सानप, अदनान शेख, नितीन बुधनर, प्रशांत कोपनर, हनुमंत गायकवाड आदींची उपस्थिती होती.

No comments