अनाथांना मदतीचा हात देवून शिवसेना महिला आघाडीच्या भगव्या सप्ताहाला प्रारंभ
शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीनिमित्त इन्फंट इंडिया येथील मुलांना शालेय साहित्य वाटप
बीड : मोडलेल्या माणसांचे दुःख ओले झेलतांना, अनाथांच्या उशाला दीप लावू झोपतांना. या ओळींची कायम शिकवण देणारे शिवसैनिकांचे प्रेरणास्थान, अखंड हिंदुस्तानचे र्हदयसम्राट शिवसेना प्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त बीड जिल्हा शिवसेना महिला आघाडीच्या वतीने सामाजिक कार्यांच्या भगव्या रविवार दि. 17 जानेवारी रोजी इन्फंट इंडिया येथील एचआयव्हीग्रस्त अनाथ मुलांना शालेय साहित्य वाटपकरून जिल्हाप्रमुख अॅड. संगिता चव्हाण यांच्या शिवसेना महिला आघाडीच्या भगव्या सप्ताहाला प्रारंभ करण्यात आले.
यावेळी जिल्हाप्रमुख अॅड. संगिता चव्हाण, इंन्फटचे संचालक दत्ता बारगजे, उपजिल्हा प्रमुख फरजाना शेख, शांता राऊत, संगिता वाघमारे, रेखा वाघमारे यांच्या हस्ते येथील मुलांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले.
यावेळी अॅड. संगिता चव्हाण यांनी बोलतांना म्हटल्या की, सर्वसामान्य लोकांच्या हितासाठी झटणारा शिवसेना हा एकमेव पक्ष आहे. समाजातील महिलांना त्यांच्या पायावर उभे करून, त्यांना सक्षम करण्यासाठी शिवसेना नेहमीच अग्रभागी असते. अनाथांच्या मदतीसाठी शिवसेना पक्ष व आम्ही कायम कटीबद्द आहोत. शिवसेना प्रमुखांच्या जयंतीनिमित्त सुरू करण्यात येणार्या भगव्या सप्ताहाला कुठून सुर्वात करण्याचा माझ्या मनस्वी प्रश्न पडला असता मला आदणीय स्व. बाळासाहेबांची शिकवण आठवली आणि शिवसेना महिला आघाडीच्या भगव्या सप्ताहाला अनाथांना मदतीचा हात देवून सुरूवात करण्याचे ठरवित सुरू केले आहेत. तसेच पुढील सात दिवसही जिल्ह्यातील उपेक्षीत घटकांना मदत करत हा सप्ताहा साजरा करणार असल्याचे यावेळी त्या म्हटल्या. तसेच येथील मुलांना तीळगुळ व खाऊ वाटप करून मकर संक्रातीच्या शुभेच्छा दिल्या.
कायम उपेक्षीतांना मदतीला हात देणारी अॅड. संगिता चव्हाण -दत्ता बारगजे
जिल्ह्यातील अनाथ व उपेक्षीत घटकासाठी कायम पुढे येवून मदतीचा हात देण्याचे काम शिवसेना महिला आघाडीच्या अॅड. संगिता चव्हाण हे करीत आहे. गेल्या अनेक वर्षापासून त्या शिवसेनेच्या भगव्या सप्ताह निमित्त असो अथवा कुठल्याही निमित्ताने त्या जिल्ह्यातील अनाथ अश्रमांना भेटी देत अनाथांच्या मदतीला धावून येतात. तसेच समाजातील उपेक्षीत घटकांवर झालेल्या अन्यायाला वाच्या फोडून न्याय मिळवून देण्यासाठी काम करत असून जिल्हाप्रमुख अॅड. संगिता चव्हाण यांची अखंडीत समाजसेवा यज्ञ कायम तेजीत असल्याचे इन्फंट इंडियाचे संस्थापक संचालक दत्ता बारगजे यांनी व्यक्त केले.
No comments