Breaking News

नागापुर पंपहाऊस येथे सभापती सौ.उर्मिला मुंडे यांच्या हस्ते ध्वजारोहण

 परळी : प्रजासत्ताक दिनानिमीत्त परळी शहराला पाणीपुरवठा करणार्या नागापुर येथील पंपहाऊस येथे सभापती सौ.उर्मिला मुंडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

 परळी नगरपालिकेच्या पाणी पुरवठा सभापतीपदी निवड झाल्यानंतर सौ.उर्मिला गोविंद मुंडे यांनी आज दि.26 जानेवारी रोजी नागापुर येथील वाण धरणातील पाणीपुरवठ्याची पहाणी केली.प्रजासत्ताक दिनानिमीत्त सौ.मुंडे यांच्या हस्ते नागपुर येथील जलशुध्दीकरण केंद्र येथे ध्वजारोहण करण्यात आले.यावेळी सौ.उर्मिला मुंडे यांच्या हस्ते बालकांना खाऊ वाटप करण्यात आले.याप्रसंगी न.प चे कार्यालयीन अधीक्षक संतोष रोडे, पाणीपुरवठा विभाग प्रमुख जाधव साहेब ,इंजि.साळवे साहेब ,शिक्षण सभापती गोपाळ आंधळे,बांधकाम सभापती अन्नपूर्णा ताई आडेपवार,तालुका खरेदी विक्री संघाचे उपाध्यक्ष गोविंद मुंडे ,नगरसेवक आयुबभाई पठाण,नगरसेवक संजय फड,पंचायत समिती सदस्य मोहनजी सोळंके,भागवत मुंडे,कल्याण मुंडे,सुभाष पुजारी,बालाजी फड,ऋषिकेश मुंडे,नरेश मुंडे,अजय खामकर,महेश मुंडे,दीपक कराळे, जगदीश ताटे व इतर उपस्थित होते.

No comments