Breaking News

पॅराडाईज हॉस्पिटलमध्ये मोफत शस्त्रक्रिया शिबीर गरजूंनी लाभ घेण्याचे रुग्णालय प्रशासनाचे आवाहन


आमेर हुसेन । बीड  

महात्मा ज्योतीबा फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा लाभ आता येथील पॅराडाईज हॉस्पिटलमध्ये गरजू रुग्णांना मिळणार असल्याची माहिती डॉ. मोहम्मद सिद्दिक, डॉ. आरशिया मोहम्मदी यांनी दिली. यामुळे रुग्णांवर हॉस्पिटलमध्ये मोफत शस्त्रक्रिया केल्या जाणार असून रुग्णांना याचा लाभ मिळणार असल्याचेही डॉ. आरशिया मोहम्मदी म्हणाल्या.

शहरातील जिजामाता चौका नजीक असलेल्या मसरत नगरमध्ये पॅराडाईज हॉस्पिटलमध्ये डिलेव्हरी, सिझर, महिलांच्या पिशवीचे आजारावरील उपचार व शस्त्रक्रियेसह लॅप्रोस्कोपी, अंज्युग्राफी, अंज्युप्लास्टिद्वारे उपचार व शस्त्रक्रिया डॉ. मोहम्मद सिद्दिक, डॉ. आरशिया मोहम्मदी करतात. 

त्यातच आता महात्मा ज्योतीबा फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजना हॉस्पीटलमध्ये लागू करण्यात आली असून या दोन्ही योजनेची अंमलबजावणीला हॉस्पीटलमध्ये सुरवात करण्यात आली आहे. यामुळे गरजू रुग्णांना याचा फायदा होणार असून रुग्णांनी या मोफत योजनेचा हॉस्पीटमध्ये लाभ घ्यावा, असे आवाहन डॉ. आरशिया मोहम्मदी यांनी केले आहे.

No comments