Breaking News

निवडणूक विभागाचा ढिसाळ कारभार ..!


गौतम बचुटे । केज

केज तालुक्यातील सुरू असलेल्या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीत प्रसिद्धी माध्यमांना विहित वेळेत माहिती  दिली जात नसल्याने निवडणूक विभागाचा ढिसाळ कारभार दिसून येत आहे.

या बाबतची माहिती अशी की, केज तालुक्यातील २३ ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांची प्रक्रिया सुरू झालेली आहे. दि. ४ जानेवारी रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. या दिवशी अनेक उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले असून त्यामुळे तालुक्यातील काही ग्रामपंचायतीच्या निवडणुका बिनविरोध झालेल्या आहेत. तसेच काही गावातील काही प्रभागातील निवडणूका सुद्धा विरोध झालेल्या आहेत. दरम्यान ही सर्व माहिती प्रसिद्धी माध्यमांना विहित कालावधीत देणे आवश्यक असतानाही एक दिवस उलटून गेला तरी अद्याप या बाबत अधिकृत माहिती निवड विभागाकडून माहिती प्राप्त झालेली नाही. त्यामुळे केज तालुक्यातील निवडणुकी संदर्भातील वृत्त अद्याप पर्यंत प्रकाशित झालेले नाही. निवडणूक विभागातील अधिकाऱ्यांशी चर्चा करूनही त्यांनी माहिती देण्यास टाळाटाळ केली जातअसून अद्याप याबाबत त्यांनी माहिती संदर्भात प्रतिसाद दिलेला नाही. त्यामुळे निवडणूक विभागाविषयी लोकात असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे.

No comments