Breaking News

बसच्या अल्प फेर्‍या व प्रवाशांच्या वणव्यामुळे माजलगाव बसस्थानकातील गाळेधारकावर उपासमारीची वेळ


बाळासाहेब आडागळे । माजलगाव 

कागदावरील नियमावर बोट ठेवून चालणाऱ्या राष्ट्रीय परिवहन महामंडळाच्या अधिकाऱ्यांच्या धोरणामुळे बीड जिल्ह्यातील सर्वच बसस्थानका मधील आस्थापना बंद होण्याच्या मार्गावर असून covid-19 च्या लॉकडाउन  नंतर अद्यापही एसटी महामंडळाची बस मार्गस्त होण्याचे नाव घेत नसून त्यातच एसटी बसच्या फेऱ्या अल्प प्रमाणात असल्याने व प्रवाशाची वनवा भासू लागल्याने बस स्थानकातील गाळेधारकावर उपासमारीची वेळ आली आहे.


माजलगाव बस स्थानकातील ही स्थिती यापेक्षा वेगळे नसून एसटी महामंडळाच्या या धोरणामुळे प्रवाशांमध्ये ही संतापाची लाट आहे. 22 मार्च च्या लॉकडाऊन नंतर एसटी पासून दुरावलेला प्रवाशी, अधिकारी वर्गांच्या धोरणामुळे अद्यापही बसस्थानकाकडे फिरकत नसून माजलगाव बसस्थानकातील सत्तर टक्के बसेस बंद असून त्या मोठ्या शहराकडे वळवण्यात आल्या आहेत. परिणामी covid-19 चे लॉकडाऊन लागण्याच्या वेळे पूर्वी माजलगाव आगारातून एसटी महामंडळाच्या बसच्या फेऱ्यांची संख्या च्या तुलनेत आज ४0 टक्केही बसच्या फेऱ्या चालू नसून ग्रामीण भागातील सर्व बसेस अपवाद वगळता बंद आहेत. लांब पल्ल्याच्या काही शहराच्या बसफेऱ्या सोडल्या तर ईतरही फेर्‍या बंद आहेत . या कारणाने प्रवाशांची प्रचंड कुचंबणा होत असून नाईलाजाने खाजगी वाहने व ट्रॅव्हल्सच्या माध्यमातून प्रवाशांना आपला प्रवास करावा लागत आहे ,परिणामी बसच्या अल्प फेर्‍या मुळे बसस्थानकाकडे प्रवाशांनी फिरकने सोडून दिले आहे . ग्रामीण भागातील प्रवाशीही खाजगी वाहनांचा सहारा घेऊन आपले शहरातील व्यवहार व कामे पूर्ण करत आहेत शिक्षण घेणारे विद्यार्थी ही एसटी महामंडळाच्या या धोरणामुळे प्रचंड वैतागले असून आधीच लॉकडाऊन मुळे शिक्षणाचा बट्ट्याबोळ झालेला असताना नववी चे महाविद्यालयापर्यंत चे ग्रामीण भागातील विद्यार्थी बसच्या फेऱ्या बंद असल्याने शाळा महाविद्यालयापर्यंत पोहोचू शकत नाहीत परिणामी शाळा महाविद्यालय सुरू झालेले असतानाही अद्यापही ते शिक्षणापासून वंचित राहत आहेत. 


एसटी महामंडळाच्या नियोजनाचा अभाव बसच्या अल्प फेऱ्या परिणामी प्रवाशांच्या बसस्थानकातील वनवा यामुळे एसटीचे उपहारगृह, बेकरी, औषध दुकान पुस्तकाचे दुकान, शूज मार्ट तसेच पार्सल ऑफिस सह इतर दुकाने बंद पडण्याच्या मार्गावर आहेत त्यातच एसटी महामंडळाच्या अव्यावहारिक भूमिकेमुळे इतर अस्थापना बंद आहेत . बिघडलेली व्यवस्था व धोरणामुळे  गाळेधारकावर मात्र उपासमारीची वेळ आली आहे. राष्ट्रीय परिवहन महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी व स्थानिक प्रशासनाने मात्र आपली अव्यावहारिक भूमिका कायम ठेवली असून आपल्या सर्व कमतरता जाणूनही बसस्थानकातील आस्थापना कशा बंद होतील हेच धोरण कायम ठेवले आहे .चुकीच्या धोरणामुळे व बंद पडत जाणाऱ्या अस्थापना मुळे जिल्ह्यातील अनेक बसस्थानकातील अस्थापना बंद असून मागील अनेक वर्षापासून हेच धोरण राहिल्याने एसटी महामंडळाचे महसूलही मोठ्या प्रमाणात बुडत आहे.


ज्या प्रमाणात आगाराच्या बस फेर्‍या त्याप्रमाणात भाडे आकारणी करावी अशी मागणी सर्व अस्थापना धारकांनी केलेली असूनही शासन स्तरावर कसलाही निर्णय घेतला जात नाही तर स्थानिक एसटी महामंडळाचे अधिकारी गाळेधारकांना नोटिसा देऊन भाडे न भरल्यास कायदेशीर कारवाई करण्याचे इशारे देत आहे.

एसटी महामंडळाने आधी आपल्या सर्व फेऱ्या पूर्ण क्षमतेने सुरू करून बसस्थानकावरील प्रवाशांची गैरसोय टाळावी ग्रामीण भागातील फेऱ्या पूर्ण क्षमतेने सुरू कराव्यात जेणेकरून विद्यार्थी, ग्रामीण स्तरावरील प्रवाशी बसस्थानकाकडे वळतील व बसस्थानकाला पूर्वीचे दिवस प्राप्त होतील ही सर्व परिस्थिती जाणून न घेता बसस्थानकातील गाळेधारकांना कायदेशीर कारवाईचे बडगे उगारनाऱ्या प्रशासनाला कायदेशीर भाषेतच लोकशाही मार्गाने उत्तर देण्याचा इशारा ,राष्ट्रवादी विद्यार्थी संघटना, भारतीय जनता युवा मोर्चा, स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया विद्यार्थी संघटना व माजलगाव बसस्थानकामधील गाळेधारकांनी एका निवेदनाद्वारे दिला आहे माजलगाव मतदार संघाचे आमदार प्रकाश सोळंके यांनीही एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांना सर्व बसेस सुरू करण्याची सूचना केलेली असून अद्यापही अधिकाऱ्यांनी मात्र त्यांच्या सूचनेकडे पूर्णपणे दुर्लक्ष केल्याचा आरोप राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे.

No comments