Breaking News

ना.धनंजयजी मुंडे साहेब यांच्या राजकीय कुरूक्षेञातील रथाचे यशस्वी सारथी म्हणजे "वाल्मिक अण्णा कराड "

राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंञी तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार धनंजयजी मुंडे साहेब यांच्या राजकीय कुरूक्षेञातील स्वतः च्या आयुष्याची बाजीलावून यशस्वी सारर्थ्य करणारे नगर परिषदेचे गटनेते वाल्मिक अण्णा कराड हे व्यक्तीमत्व अगदी फणसा सारखे आहे. वरकरणी पाहता पुर्णपणे काटेरी व कठीण दिसते परंतु त्यांच्या सहवासात गेल्यावर अंतरमन माञ अगदी मृदु ,मुलायम, हळवं आणि प्रेमळ अगदी भोळा शंकर म्हटले तर अतिशयोक्ती ठरणार नाही. कारण आण्णांची मर्जी एखाद्यावर बसली तर अंगावरचे कापडसुध्दा काढून देतील!आणि एखाद्याने विश्वासघात किंवा दगा दिला तर समोरच्याचा भस्मासूरासारखा भस्म केल्याशिवाय सोडणार नाहीत. असे हे आदरणीय आण्णा . नामदार धनंजयजी मुंडे साहेब यांच्या बाबतीत संकटकाळात साहेबांच्या पुढे ढाल होऊन येणारे प्रत्येक घाव स्वतः च्या अंगावर घेतील, आणि आनंदाच्या क्षणी माञ साहेबांच्या पाठीशी उभे राहून इतर कार्यकर्त्यांना ना.धनंजयजी मुंडे साहेब यांच्या समोर उभ करतील हे आदरणीय आण्णांच्या मनाचा मोठेपणा होय. 

परळी शहराला ऐतिहासिक, धार्मीक परंपरेचा वारसा लाभला आहे तसा परळीत उजळ राजकीय परंपरेचा फार मोठा इतिहास आहे. शहरात अनेक राजकीय विभूती होऊन गेले. त्यातील काहींनी आपला ठसा शहरात उमटवला आहे. यांची नावांची यादी करायची म्हटली तर खूप होईल, पण यामधील बोटांवर मोजण्याइतके अशा व्यक्ती आहेत,की त्यांच्या नावाशिवाय या शहराचा इतिहास पूर्ण हॊणार नाही.आणि यामधील अग्रक्रमाने नावउल्लेख व्हावा,असं अभूतपूर्व व्यक्तिमत्त्व म्हणजे आमचे,वाल्मिक आण्णा, उर्फ सर्वांचे लाडके आण्णासाहेब.

असं म्हटले जात की प्रत्येक मोठया व्यक्तिमागे,पडद्याआड किंवा आघाडीवर न राहता,पाठीमागे राहून कार्य करणारा,आणि आपल्या नेत्रत्वास मोठं करणारा,या सर्वं गोष्टीत आण्णासाहेब यांना आजच्या घडीला पर्याय नाही, व भविष्यात असणार पण नाही.

तीस पस्तीस वर्षांपूर्वी ग्रामीण भागातील एक तरुण, शहरात शिकण्यासाठी येतो आणि मग अतिशय संघर्ष करत मेहनत घेत,स्वकर्तुत्वाने आपली ओळख फक्त शहरात नाही तर अवतीभवती असलेल्या पंचक्रोशीत करतो, आणि हे करत असताना कधी नेत्यांकडून शाबासकी मिळत असते. तर तत्कालीन जवाहर शिक्षण संस्था निवडणुकीत ,नेत्यावर होणारा गोळीबार आपल्या अंगावर घेउन, जीवाची देखील पर्वा न करता,फक्त नेतृत्वाचा विचार करतो,आणि यांबद्दल कसलीही,खंत तमा न बाळगता, फक्त आपल्या नेत्याविषयी, आदर भावना व्यक्त करत,आधुनिक राम भक्त हनुमान, बिरुदवली प्राप्त करून घेतो,तो तरुण म्हणजे, आमचे आण्णासाहेब! 


साधारणपणे वीस पंचवीस वर्षांपूर्वी १९९६ नगरपरिषद निवडणूकीत, अण्णासाहेब प्रथमतः नगरसेवक म्हणून निवडून आले, त्यानंतर एक दोन वर्षात उपनगराध्यक्ष पदी असतानाच, प्रभारी नगराध्यक्ष मिळवून, आपल्या कार्याची चुणूक दाखवून दिली.पुढे पुढील निवडणुकीत पक्षाने उमेदवारी दिली नाही, तरीही त्याच जोमाने पक्ष निष्ठा म्हणून काम करत,जो उमेदवार दिला त्यास,प्रचंड मतांनी निवडून आणले. यामधून फक्त पक्ष निष्ठा,आणि नेतृत्वा विषयी असलेलं प्रेम दिसून येते. 

आपल्या नेत्यावर आपल्या राजकीय जीवनात काही संकट येईल त्यावेळी अण्णासाहेब, एखाद्या चिरेबंदी भिंती प्रमाणें, कसलाही भलाबूरा विचार न करता,पाठीमागे जे उभे आहेत,ते आजतागायत.कोणतीही निवडणूक असो,किंवा कोणताही सार्वजनिक कार्यक्रम आयोजित करण्यात येणार असो,अण्णासाहेब तण-मन-धन, अर्पण करून, तो कार्यक्रम कमालीचा यशस्वी करतात, की त्यांची चर्चा संपूर्ण राज्यभर होते,त्याच प्रमाणात, कोणतीही निवडणूकित,व्यवस्थापन असं करतात, की समोरील निवडणूक लढवत असलेला उमेदवार आपला पराभव अगोदरच मान्य करतो, आणि यालाच चाणक्य नीती म्हणतात.

धार्मिक श्रध्दाळू आण्णा 

राजकीय क्षेत्रात असलेल्या व्यक्ती आध्यात्मिक क्षेत्रात फारशा पाहायला मिळत नाही. परंतु वाल्मिक अण्णा कराड प्रभू वैद्यनाथ आणि श्री गणेशाचे न चुकता ञिकाल दर्शनार्थी आहेत. अखंड वृतवैकल्य, उपवास आणि उपासना करतात येवढ्या व्यापातून आणि व्यस्ततेतून पण ते आपल्या नित्य उपासना न चुकता करतात. आण्णा मातृभक्त, पुत्रवत्सल सोबतच श्री स्वामी समर्थांच्या निस्सीम भक्त असलेल्या वाहिणीसाहेब सहचारिणी म्हणून लाभल्या आहेत. 

अण्णा कायम आपल्या साहेबांसाठी जीवाचे रान करून साहेबांच्या प्रत्येक कार्यात मोलाचा वाटा उचलतात. परंतु खाजगीत अण्णासाहेबांकडून कामे करवून घेऊन बाहेर अण्णांच्या नावाने बदनामी करणाऱ्या काही आपल्याच कार्यकर्त्यांनी मात्र कर्तृत्ववान वाल्मिकआण्णा यांच्या नावावर मळभ आणण्याचा प्रयत्न करीत आहेत. या दरम्यान अलेल्या भल्याबुर्या गोष्टी हलाहल प्रमाणे पचवून चेहऱ्यावर तोच धीरोदत्त पणा आण्णा बाळगतात.

आधुनिक चाणक्य,नेतृत्वा चे कट्टर हनुमान, कार्यकर्त्यांचे आधार,शहरातील विकासकामाचा महामेरू,लॉक डाऊन काळात,गोरगरीब जनतेला अन्न देऊन त्यांची भूक भागवणारे,उन्हाळ्यात भगिरथाप्रमाणे पाणी वाटप करणारे,शून्यातून विश्व निर्माण करणारे,आधुनिक विश्वकर्मा, फक्त फक्तं आमचे आदरणीय आण्णासाहेब..!आदरणीय वाल्मिक आण्णा कराड यांना दिर्घ निरोगी आयुष्य,ऐश्वर्य लाभो हीच वाढदिवसाच्या निमित्ताने प्रभू वैद्यनाथ चरणी प्रार्थना!

आपला 

गोपाळ रावसाहेब आंधळे 

सभापती शिक्षण, क्रिडा व सांस्कृतिक कार्य समीती 

नगर परिषद परळी वैद्यनाथ 

9823335439


No comments