Breaking News

देशमुख महिला महाविद्यालयात सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात

परळी वैजनाथ :   येथील लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त "महिला शिक्षीका दिन"  उत्साहात साजरा करण्यात आला.

               राणी लक्ष्मीबाई टाँवर चौक परिसरात असलेल्या लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयात सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. डॉ. विनोद जगतकर, तर प्रा.डॉ. प्रविण दिग्रसकर, प्रा.नव्हाडे, प्रा.पि.एम.फुटके उपस्थित होते. सुरुवातीला क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बोलताना प्रा. डॉ. जगतकर यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जिवन कार्यावर प्रकाश टाकला. तसेच सावित्रीबाई फुले व महात्मा फुले यांचा त्याग इतर सर्व समाजकार्य करणाऱ्या समाजसुधारकां पेक्षा जास्त आहे. फुले दामपत्य जर समाजसुधारनेत आले नसते तर ते उद्योजक झाले असते.असे ही श्री.जगतकर यांनी सांगितले. गायत्री पुजारी व आफरिन शेख या विद्यार्थ्यांनी मनोगते व्यक्त केली. प्रास्ताविक प्रा.नव्हाडे, सूत्र संचालन गायत्री केंद्रे, कुरेशी इरम फातेमा यांनी तर आभार वैष्णवी घायाळ हिने मानले.

No comments