Breaking News

संत भगवानबाबांनी अध्यात्माच्या माध्यमातून समाजसुधारणेसाठी शिक्षणाचे महत्व पटवून दिले―प्रा.विजय मुंडे

मांडेखेल येथे राष्ट्रीय संत भगवान बाबा यांची पुण्यतिथी साजरी

परळी : तालुक्यातील  मांडेखेल  येथे  ऐश्वर्यसंपन्न राष्ट्रीय संत भगवान बाबा यांच्या पुण्यतिथीनिमित्त गावातील नागरिक व युवकांनी बाबांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.ऐश्वर्या संपन्न राष्ट्रीय संत भगवान बाबा यांनी अध्यात्माच्या माध्यमातून समाजसुधारणेसाठी  भरीव कार्य  केले  आणि आपले आयुष्य समाजाला अंधश्रद्धेच्या खाईतून वर काढण्यासाठी खर्च केले मागासलेल्या समाजातील समाजातील मुलांमध्ये शिक्षणाची बीजे रोवली म्हणून बाबांचे विचार महान असून समाजाच्या सुधारणेसाठी शिक्षण आवश्यक असल्याचे प्रतिपादन परळी मार्केट कमिटीचे उपसभापती प्रा. विजय मुंडे यांनी केले.


गावातील नागरिक तसेच तरुणांनी गावात कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते युवकांनी खास पुढाकार घेऊन  गावातील युवकांच्या कमिटीने प्रसादाचे आयोजन केले होते. भगवान बाबांनी समाजसुधारणेसाठी खूप अथक परिश्रम घेतले गावागावात जाऊन आई-वडिलांना शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले शिक्षणा विना माणूस हा पशूच असतो त्याला कशाचेही ज्ञान होत नाही म्हणून ज्ञानार्जन करण्यासाठी शिक्षण घेतले पाहिजे असे बाबा म्हणत म्हणून प्रत्येक आई-वडिलांनी आपल्या पाल्यांना उच्च शिक्षित करावे असेही प्रा विजय मुंडे यांनी सांगितले.

यावेळी  गोपाळ नागरगोजे, सुदाम नागरगोजे ,बळीराम घुगे, गोविंद मुंडे ,भानुदास नागरगोजे, प्रा.संदिपान मुंडे ,सुरेश नागरगोजे, अरुण घुगे ,दशरथ नागरगोजे ,समाधान घुगे, बाजीराव घुगे ,दामोदर घुगे, संदिपान नागरगोजे ,किरण मुंडे, जीवन पांचाळ आदीसह गावातील नागरिक आणि युवक उपस्थित होते.


No comments