Breaking News

जमिनीसाठी जन्मदात्याला ठोकलं !

दिवट्याविरुध्द पोलिसात गुन्हा दाखल केज । गौतम बचुटे 

मला अर्धी जमीन का वाटून देत नाही? असे म्हणून जन्मदात्याला दिवट्याने आपल्या चुलत्याच्या मदतीने गज आणि बेल्टने ठोकल्याची घटना केज तालुक्यातील ढाकणवाडीत घडली. याप्रकरणी दिवट्याविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या बाबतची माहिती अशी की, केज तालुक्यातील ढाकणवाडी येथील रामेश्वर हंगे यांना दोन मुले आहेत. दि.२३ जानेवारी रोजी सकाळी ९:३० च्या दरम्यान त्यांचा मुलगा किशोर व त्यांचा भाऊ नवनाथ हंगे हे दोघे चुलते-पुतणे घरी आले. किशोर हा त्याचे वडील रामेश्वर हंगे यास म्हणाला तुमच्या नावावरील असलेली अर्धी जमीन ही माझ्या नावावर का करीत नाहीत? तेव्हा ते म्हणाले की, अर्धी जमीन मी तुझ्या एकट्याच्या नावे कशी काय करू? असे म्हणताच किशोर हंगे याने कमरेच्या बेल्टने मारहाण सुरू केली. तसेच नवनाथ हंगे याने लोखंडी गज डोक्यात मारून डोके फोडले. तसेच त्यांची पत्नी यांना पण मारहाण केली. या प्रकरणी रामेश्वर हंगे यांच्या तक्रारीवरून केज पोलीस स्टेशनला गु. र. नं. ३७/२०२१ भा. दं. वि. ३२३, ३२४, ५०४, ५०६ व ३४ नुसार मुलगा किशोर हंगे आणि भाऊ नवनाथ हंगे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.No comments