Breaking News

माजलगावात एकाच दिवशी दोन ठिकाणी चोऱ्या सव्वादोन लाखांचा मुद्देमाल केला लंपास


माजलगाव : - शहरातील  गजानन नगर येथून एकाच्या बंद घराच्या खिडकीच्या जाळ्या तोडून चोरी करण्यात आली . तर फुले नगर येथून एकाच्या घरातून दोन मोबाईलसह नगदी ५ हजार रुपये लंपास करण्यात आले.या दोन्ही घटना माजलगावात एकाच दिवशी गुरुवारी घडण्यात आल्या . दोन ठिकाणी झालेल्या चोऱ्यामधून चोरट्यांनी सव्वा दोन लाखाचा मुद्देमाल लंपास केला आहे.

      शहरातील गजानन नगर येतील रहिवासी  रामेश्वर भंडारी हे परिवारासह गुरुवार दि ७ रोजी वडवणी येथील आपल्या मुलीला  भेटण्यास गेले होते.या वेळी घराला कुलूप असल्याने घरात कोणीच नसल्याचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी रात्री केव्हातरी घराच्या खिडकीच्या जाळ्या तोडून घरात प्रवेश केला.यावेळी चोरट्यांनी घरातील सामानाची तोडफोड करून कपाटातील ५० हजार नगदी रुपये एक ग्रॅमच्या तीन सोन्याच्या अंगठ्या , दीड ग्रॅम सोन्याचे झुंबर ज्याची अंदाजित किंमत दीड लाख रुपये असा दोन लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास केला .

        त्याचप्रमाणे शहरातील फुले नगर भागात राहणारे विठ्ठल विश्वनाथ बोबडे यांच्या घरातून दोन मोबाईल्स किम्मत २० हजार रुपये व ५ हजार नगदी रुपये गुरुवार दि .७ रोजी पहाटे च्या दरम्यान लंपास केले . दरम्यान बोबडे यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्या विरोधात माजलगांव शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे . रामेश्वर भंडारी यांच्या घरात झालेल्या चोरीची फिर्याद लिहन घेण्याची प्रक्रिया पोलिसांकडून दुपारपर्यंत सुरू होती.दरम्यान शहरात एकाच दिवशी दोन चोर्या झाल्याने चोरट्यांचे पोलिसांसमोर आव्हान निर्माण झाले आहे.

No comments