Breaking News

पदवीधर अंशकालीन उमेदवारांची रिक्त पदे तातडीने भरा : ना. नवाब मलिक यांचे सबंधितांना निर्देश


मुंबई : राज्यातील अंशकालीन उमेदवारांना कंत्राटी तत्वावर नेमणूक देण्याच्या धोरणात्मक मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय होऊन देखील त्याची अंमलबजावणी होत नसल्याने ना. नवाब मलिक यांनी नाराजी व्यक्त करत ही बाब गंभीर स्वरूपाची असल्याचे मत व्यक्त करत राज्यातील सर्वच अंशकालीन उमेदवारांची रिक्त पदे तातडीने भरण्याचे निर्देश सबंधितांना  ना.  मलिक यांनी दिलेत.

राज्यातील पदवीधर अंशकालीन उमेदवारांना विशेष बाब म्हणून कंत्राटी तत्वावर नौकरीची संधी उपलब्ध करून देण्यासंबधी धोरणात्मक निर्णय घेण्यात आला व शासन निर्णय अनुक्रमे 02 मार्च 2019 व 17 जुन 2019 तसेच 30 सप्टेंबर 2020 पारित करण्यात आले परंतू प्रत्यक्षात मात्र राज्यात त्याची अंमलबजावणी होत नसल्याचे दिसुन येत होते. यामुळे अंशकालीन उमेदवारांना नौकरी पासुन वंचित रहावे लागत आहे. याबाबत दि.13 जाने. 2021 रोजी  मंत्रालय मुंबई येथे आयोजित बैठकित मा.मंत्रीमहोदयांनी नाराजी व्यक्त करून अंशकालीन उमेदवारांनी आपले आयुष्य नोकरी मिळावी याकरिता शासनाने दिलेली कोणती हि कामे केली. या उमेदवारांना कंत्राटी तत्वावर नेमणूक देण्याच्या धोरणात्मक निर्णय होऊन देखील याची अंमलबजावणी होत नसेल तर ही बाब गंभीर स्वरूपाची असल्याचे मत बैठकित व्यक्त करून  राज्यातील सर्वच विभागांना सुचित करून सर्व विभागाची आपले कडील रिक्त पदे शासनाच्या नियमास अधिन राहुन अंशकालीन उमेदवारां करीता  रिक्त असणारी सर्व पदे तातडीने भरण्याचे निर्देश दिले. तसेच याबाबत ज्या जिल्हयामध्ये कार्यवाहि होत नसल्यास याकरिता राज्यातील सर्वच जिल्हयाच्या रिक्त पदांच्या आढावा घेण्याकरिता राज्यातील जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी  यांना सुचना केल्या.   तसेच राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार सर्वोतपरी अंशकालीन उमेदवारांच्या पाठिशी असुन आवश्यक ते सर्व सहकार्य करण्यात येईल असे सांगितले. .

या बैठकिस श्रीमती अंशु सिन्हा प्रधान सचिव कौशल्य विभाग, श्री. दिपेंद्रसिंह कुशवा आयुक्त कौशल्य विभाग, श्री. रोकडे अवर सचिव, श्री. संतोष राऊत सहसंचालक , तसेच कोल्हापुर जिल्हा विधानसभा सदस्य मा.श्री. प्रकाश आबिटकर यांचे मोलाच्या सहकार्यानेच मंत्रालयीन स्तरावर बैठकिचे नियोजन करण्यात येऊन सदर बैठकित मा.आमदार श्री. प्रकाश आबिटकर यांनी पारित शासन निर्णयाची अंमलबजावणी होत नसल्याचे सांगुन अंमलबजावणी बाबत आपले विचार मांडले.


  बैठकित महाराष्ट्र प्रदेश संघटनेच्या प्रदेशाध्यक्षा रेखा आहेरराव प्रदेश उपाध्यक्ष अब्दुल सईद प्रदेश सचिव मिलींद भोले  व संघटनेचे प्रतिनिधी एकनाथ मोरे, बाबासो जठार, सुरेखा गुरव, पदमा चिंतले  ईं उपस्थित होते.  तसेच या बैठकिसाठी मा. वासियोद्दीन ईनामदार यांचे मोलाचे मार्गदर्शन प्राप्त झाले.

No comments