Breaking News

शेतकरी संघटनेच्या कार्यकारिणीची औरंगाबाद येथे तातडीची बैठक

औरंगाबाद- मोदी सरकारने कोरोना महामारीच्या काळात 28 सप्टेंबर 2020 रोजी पारित केलेल्या तथाकथित तीन कृषी सुधारणा कायद्याच्या अंमलबजावणीला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्याने शेतीमालाच्या खरेदी विक्रीत देशभरात अभूतपूर्व गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे.यावर विचार विनिमय करण्यासाठी मा.रघुनाथदादा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत शेतकरी संघटनेच्या कार्यकारिणीची तातडीची बैठक  दि. 25 जानेवारी 2021 रोजी, सकाळी 10.30 वाजता. गांधी भवन, सावरकर चौक,समर्थ नगर,औरंगाबाद. येथे आयोजित केली आहे.अशी माहिती शेतकरी संघटनेचे औरंगाबाद जिल्हा प्रमुख निलेश बारगळ यांनी दिली.

     


या बैठकीसाठी शेतकरी संघटनेचे  कार्याध्यक्ष कालिदास आपेट,शेतकरी युवा आघाडीचे ऍड.अजित काळे, महिला आघाडी प्रमुख विमलताई आकनगिरे, क्रांतिसिंह नाना पाटील ब्रिगेडचे शिवाजीराव नांदखिले,मराठी कवी लेखक संघटनेचे दिनकर दाभाडे यांच्यासह मराठवाडा प्रमुख बंडू सोळंके, पश्चिम महाराष्ट्र प्रमुख बाळासाहेब पटारे,विदर्भ प्रमुख धनंजय काकडे पाटील, मुंबई विभाग प्रमुख गणेश घुगे,उत्तर महाराष्ट्र प्रमुख केशवराव पाटील आदि.प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

      मोदी सरकारने पारित केलेले कृषी सुधारणा कायदे रद्द करण्यासाठी 26 नोव्हेंबर 2020 पासून पंजाब,हरियाणा, हिमाचल,उत्तरप्रदेश,राजस्थान,दिल्ली परिसरातील विविध शेतकरी संघटनांनी दिल्ली जवळ बेमुदत 'ठिय्या' आंदोलन सुरू केले आहे.शेतकरी आंदोलनाची सर्वोच्च न्यायालयाने दखल घेऊन तथाकथित कृषी सुधारणा कायद्याच्या अंमलबजावणीला स्थगिती दिली आहे.यामुळे देशांतर्गत शेतीमाल खरेदी विक्रीचे दर आधारभूत किंमतीपेक्षा खुपच कोसळले आहेत. महाराष्ट्रातील साखर कारखाने, कापूस फेडरेशन, सी. सी. आय, दुध संघ, नाफेड, एफ. सी. आय आणि बाजार समित्या मधून शेतीमालाला आधारभूत किंमत दिली जात नसताना उध्दव ठाकरे सरकारमध्ये सामील असलेले राजकीय पक्ष काॅग्रेस,NCP, शिवसेना,डावे, पुरोगाम्यांनी दिल्लीतील आंदोलनाला पाठिंबा देवून जबाबदारी झटकली आहे.याचा सोक्षमोक्ष लावण्यासाठी शेतकरी संघटनेचे जिल्हाप्रमुख,तालुका प्रमुख यांच्यासह प्रमुख कार्यकर्त्यांनी बैठकीला उपस्थित राहावे.असे आवाहन निलेश बारगळ यांनी केले आहे.

मुक्कामी येणाऱ्या कार्यकर्त्यांची केली जाणार व्यवस्था

आदल्यादिवशी मुक्कामी येणाऱ्या कार्यकर्त्यांच्या मुक्कामाची व्यवस्था करण्यात आली असून मुक्कामी येणाऱ्या कार्यकर्त्यांनी निलेश बारगळ, 8149008383, ऍड.अजित काळे,9422223123, कालिदास आपेट,9822061795 यांच्या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन श्री. बारगळ यांनी केले आहे.


No comments